अन्नपूर्णा अन्नछत्रालयास शिवभोजन केंद्राची मान्यता

annpurna.jpg
annpurna.jpg


देगलूर, (जि.नांदेड) ः येथील अन्नपूर्णा अन्न छत्रालयास शासनाच्या शिव भोजन केंद्राची मान्यता मिळालेली आहे. बुधवार (ता.एक) रोजी शिवभाेजन केंद्रही चालू करण्यात आले. या वेळी कोराेनाच्या पार्श्वभूमीवर इतर राज्यातील येथे थांबलेले मजूर व इतर वाटसरूंना या शिवभेजन केंद्रातून बुधवारी (ता.एक) रोजी अन्नदान करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून देगलूर शहरात अन्नपूर्णा अन्नछत्र यातून निराश्रित बेघर वाटसरूंना एक वेळेच्या जेवणाची भूक भागविली जात असल्याने हे केंद्र त्यांचे आधार बनले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सोशल डिस्टन्सचा फटका या केंद्राला बसला. त्यामुळे नाईलाजास्तव हे अन्नछत्र काही काळासाठी बंद करण्यात आले होते.


अन्नधान्यअभावी मोठी आभाळ
उपजिल्हाधिकारी शक्ती कदम तहसीलदार अरविंद बोळंगे हे येथील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून शिवभेाजन केंद्र कोराेनाच्या पार्श्वभूमीवर चालू करण्याच्या प्रयत्नात होते. त्याच्या अनुषंगाने त्यांनी येथील अन्नपूर्णा अन्नछत्रालयाच्या सदस्याकडून शिव भोजन केंद्राच्या संदर्भातला प्रस्ताव मागून घेऊन तो शासनाकडे पाठविला व लगेच त्याला मान्यताही मिळाली. बुधवारी कर्नाटकात अडकलेले तीस मजूर व इतर शहरातील वाटसरुंना शिव भोजन केंद्रातून जेवणाचा आस्वाद घेतला. येथील अन्नपूर्णा अन्न छत्रालयाच्या कार्यरत सदस्यांनी रुग्णालयातील रुग्णांसह इतर सदस्यांनाही तेथे नेऊन जेवणाचे डबे पोहोचविले. या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर हस्य हास्य फुलल्याचे दिसले. सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने हातावर पोट असणाऱ्यांची अन्नधान्यअभावी मोठी आभाळ होत असल्याचे दिसून येत आहे.


सामाजिक दायित्व पूर्ण
या पार्श्वभूमीवर शहरातील विविध दानशूरांनी अन्नधान्य पुरवठा करून आपले सामाजिक दायित्व पूर्ण केले असून अनेकजण यासाठी पुढे येत असल्याचे सकारात्मक चित्र शहरातून दिसून येत आहे. यासाठी प्रशासनातील उपजिल्हाधिकारी श्री शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळंगे, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरोदे, पोलिस निरीक्षक भगवानराव धबडगे यांनी मोठी भूमिका निभावलेली आहे.


आता तर शिव भोजन केंद्र सुरू झाल्याने जेवणाची भ्रांत होणाऱ्यांची ह्या मधून सुटका होण्याची आशा शहरवासीयतून व्यक्त केली जात आहे. शिव भोजन केंद्र चालू ठेवण्यासंदर्भातल्या सरकारी पातळीवरील तांत्रिक बाबी मोठ्या किचकट असल्याने आमच्या स्वयंसेवी संस्थेची यामध्ये मोठी अग्नि परीक्षा ठरणार आहे. मात्र सामाजिक दायित्वातुन हे शिवधनुष्य आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करू असे शंतनू महाराज देगलूरकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com