उपजिल्हा रुग्णालयातील वार्ड काेराेनाग्रस्तांसाठी राखीव

सुनिल पौळकर
बुधवार, 1 एप्रिल 2020


आराेग्य विभागाचे उपसंचालक डाॅ. एकनाथ माले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संताेष शिर्शीकर, तहसीलदार काशिनाथ पाटील, पाेलिस निरीक्षक एन. जी. आकूसकर, डाॅ. रमेश गवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. काेराेनामुळे भविष्यात अचानक उद्‍भवणाऱ्या परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या १०० खाटांपैकी ५० खाटा कोराेनाग्रस्तांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुखेड, (जि.नांदेड) ः जिल्ह्यात ग्रामीण स्तरावर शंभर खाटांचे मुखेड येथे एकमेव माेठे उपजिल्हा रुग्णालय आहे. सध्या थैमान घातलेल्या काेराेना विषाणूच्या प्रादुर्भावाचा आपल्या भागात संसर्ग वाढण्याची शक्यता पाहता उपलब्ध असलेल्या शंभर खाटांपैकी पन्नास खाटा या केवळ काेराेनाग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, अशा सूचना आमदार डाॅ. तुषार राठाेड यांनी साेमवारी (ता. ३१) उपजिल्हा रुग्णालयाच्या आढावा बैठकीत दिल्या.

 

५० खाटा कोराेनाग्रस्तांसाठी
मागील दाेन-तीन आठवड्यांपासून सगळीकडेच काराेनाग्रस्त रुग्णसंख्येमध्ये वाढ हाेत आहे. याच संसंर्गजन्य विषाणूची आपल्या परिसरात लागन झाल्यास त्याच्यावर उपाययाेजना करण्यासाठी साेमवारी आराेग्य विभागाचे उपसंचालक डाॅ. एकनाथ माले, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संताेष शिर्शीकर, तहसीलदार काशिनाथ पाटील, पाेलिस निरीक्षक एन. जी. आकूसकर, डाॅ. रमेश गवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली. काेराेनामुळे भविष्यात अचानक उद्‍भवणाऱ्या परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी उपलब्ध असलेल्या १०० खाटांपैकी ५० खाटा कोराेनाग्रस्तांसाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये ५० खाटांपैकी १८ खाटा संशयित काेराेग्रस्तांसाठी, पाॅझिटिव्हसाठी २० खाटा, अत्यवस्थ रुग्णांसाठी सहा, तर चार व्हेंटिलेटर, दाेन माॅनिटर सीपअप, दाेन बाय अप पल्स आॅक्सीमीटर आदींची व्यवस्था या ५० खाटांसाठी सज्ज करण्यात येणार आहेत. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. लखमावार, मुखेड येथील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. आनंद पाटील, खासगी वैद्यकीय व्यावसायिक डाॅ. दिलीप पुंडे, डाॅ. वीरभद्र हिमगिरे, डाॅ. व्यंकटेश केदार गुंटूरकर, पंचायत समितीचे सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, नगराध्यक्ष बाबूराव देबडवार, माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, जगदीश बियाणी, राम पत्तेवार, डाॅ. व्यंवार्कट सुभेदार (भाेसले), डाॅ. संगेवार, अशाेक गजेलवाड, विजय काेत्तापल्ले, किशाेर चाैहान आदींची उपस्थिती हाेती.

काेराेनाग्रस्तांसाठी काेविड-१९ रुग्णालय युनिट
आगामी काळात वाढलेल्या काेराेनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता एक काेराेना समर्पित युनिट तयार करण्यात येत असून या युनिटमध्ये काम करण्यासाठी तज्ज्ञ डाॅक्टरांना पाचारण करण्यात येणार आहे. या युनिटचे इनचार्ज म्हणून बिलाेली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. लखमावार यांची नियुक्ती करण्यात आली असून या युनिटचे नाेडल आॅफिसर म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. संताेष शिर्शीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या युनिटमध्ये दाेन फिजिशियन, दाेन भूलतज्ज्ञ, दाेन बालराेगतज्ज्ञांची प्रतिनियुक्ती करण्यात येणार असून दाेन वैद्यकीय अधिकारी, असे एकूण दहा जणांचे पथक करण्यात येणार आहे. (ता. सात) एप्रिलपर्यंत या सर्व तज्ज्ञ डाॅक्टरांच्या वैद्यकीय ट्रेनिंग पूर्ण करून याेग्य त्या भाैतिक दुरुस्ती व साफसफाई करून (ता. दहा) एप्रिलपर्यंत उपजिल्हा रुग्णालयामध्ये हे समर्पित काेविड-१९
काेराेना हे रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा -  माहूरगडावरील दत्त शिखर संस्थानची अकरा लाख रुपयांची मदत

अद्यावत यंत्र खरेदीसाठी ५० लाखांचा आमदार निधी
काेराेनाग्रस्तांच्या इलाज करण्यासाठी लागणारे व्हेंटिलेटर, माॅनिटर, बाय अप पल्स आॅक्सीमीटर हे साहित्य जिल्हा शल्यचिकित्सकांच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांत खरेदी करण्यासाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डाॅ. तुषार राठाेड यांनी भ्रमणध्वनीवर बाेलतांना दिली. त्याच बराेबर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना साेबत दाेन नवीन कक्षांची निर्मिती करणार असल्याचेही सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reserved for corona ward ward victims, nanded news