शेंदूरवादा - अनेक वर्षापासून राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सभापती पदासाठी हुलकावणी होत असलेल्या शेंदूरवादा सर्कलला कृषी उत्पन्न बाजार समितीची सभापतीची माळ आज शेंदूरवादा (ता. गंगापूर) सर्कलमधील अर्चना कृष्णा सुकासे यांच्या गळ्यात पडल्याने शेंदूरवादा सर्कलमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे.