

Centuries-Old Heritage Under Threat; Preservation Plea for Ardhapur’s Historic Artifacts
sakal
-लक्ष्मीकांत मुळे
अर्धापूर: ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अर्धापूर शहरातील शिलालेख, कलाकृती, नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.या वस्तू उघड्यावर पडल्या असून उन, पाऊस वारा नैसर्गिक संकटांचा सामना करित आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडा देत आहेत.बाराव्या शतकातील शिलालेखावरील आक्षरं मिटत आहेत.शहराचा इतिहास सांगनारा हा शिलालेख शेवटची घटका मोजत आहे.शहरातील ऐतिहासिक शिलालेख व कलाकृती जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी नागरीकातुन केली जात आहे.