

Success Story
sakal
कळमनुरी : भारतीय सैन्य दलात असलेल्या वडिलांना पाहून आपणही सैन्यात अधिकारी व्हावे, असे स्वप्न पाहणाऱ्या अर्जुन राजकुमार डुरे याची राष्ट्रीय संरक्षण अकादमीत (एनडीए) प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे कुठलेही क्लासेस न लावता, नियमित अभ्यासाच्या बळावर अर्जुन डुरे याने या अखिल भारतीय परीक्षेत २३० वा क्रमांक मिळवला. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी आहे.