esakal | कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी
sakal

बोलून बातमी शोधा

Asavari

कौतुकास्पद! औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: ग्राफिक्स डिझाईन हे जागतिक पातळीवर करिअरच्या सर्वोत्तम क्षेत्रापैकी एक आघाडीचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. याच क्षेत्रात मराठमोळ्या असलेल्या औरंगाबादची कन्या आसावरी सुहास कुलकर्णी या तरुणीने थेट अमेरिकेत आपल्या कार्याची छाप पाडत ग्राफिक्स डिझाईन मधील आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. नुकतेच आसावरीला अमेरिकेत मानाचा असणारा ग्राफिक्स डिझाईन युएसए पुरस्कार ब्रॅण्डिंग अॅण्ड वेबसाईट डिझाईन प्रोजेक्ट ऑफ व्हिजिबल व्हाईसेस पोडकास्टसाठी देण्यात आला. यासोबतच या विशेष प्रकल्पासाठी क्रिएटिव्ह क्वारर्टली ४९ हे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

आसावरी कुलकर्णी ही औरंगाबादेतील छपाई क्षेत्रातील प्रिंटवेल कंपनीचे दिवंगत संचालक सुहास कुलकर्णी व विद्यमान संचालिका सुनिता कुलकर्णी यांची कन्या आहे. तीने नवी दिल्ली येथील इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या डिझाईन महाविद्यालयातून फॅशन कम्युनिकेशन्सची पदवी उत्तीर्ण करुन ग्राफिक्स डिझाईनमधील उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील मार्यालॅण्ड इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ आर्ट गाठले.

हेही वाचा: सावधान! तंबाखू खाऊन थुंकणाऱ्यांवर होणार कारवाई

ग्राफिक्स डिझाईनमधील मैलाचा दगड समजल्या जाणाऱ्या मिलवॉकी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट अँड डिझाईन मधील फेलोशिप मिळवली. अमेरिकेतील बोस्टनमध्ये आघाडीची ग्राफिक्स डिझाइनर म्हणून तीने सेवा बजावली. याच क्षेत्रातील नामवंत अशा डिजीटल टीम सोबतही ती कार्यरत आहे. औरंगाबादच्या या मराठी कन्येने अमेरिकेत यश संपादन केल्याबद्दल तीचे भारत व अमेरिकेत कौतुक होत आहे.

loading image