
धनंजय शेटे
भूम : आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्यावर आष्टा गावातील ग्रामस्थांच्या वतीने जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत केले. भूम येथील मुक्काम उरकून पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या आदिशक्ती मुक्ताई पालखीचे आष्टा येथे आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाल्याचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. ग्रामस्थांनी हृदयातून आलेल्या भक्तिभावासह फुलांची उधळण केली, आणि टाळ-मृदंगांच्या लयात मुक्ताईचे जंगी स्वागत केले.