

Dharashiv
esakal
धाराशिव: आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी, भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सज्ज झाले आहे. मराठवाड्यातील सात विभागांमधून एकूण १२६० जादा बस सोडण्याचे नियोजन झाले आहे. यामध्ये जळगाव विभागाकडून चालक-वाहकांसह मिळणाऱ्या ५० बसचाही समावेश आहे.