आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashadi ekadashi Special train to Pandharpur

आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी विशेष रेल्वे

औरंगाबाद - आषाढी एकादशीनिमित्ताने मराठवाड्यातील जालना, नांदेड आणि औरंगाबादहून पंढरपूर आणि परतीसाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या विशेष रेल्वे शनिवार धावणार आहेत. प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने या तिन्ही गाड्यांच्या रेक स्वनरचनेत बदल करून डब्यांची संख्या वाढवली आहे.

अशी असेल सेवा

- जालना- पंढरपूर - जालना विशेष रेल्वे गाडी (क्र ०७४६८) पूर्वी १३ डब्यांची धावणार होती. आता मात्र यामध्ये पाच डब्बे वाढविण्यात आले आहेत. शनिवारी (ता. नऊ) ही गाडी १८ डबे जोडून धावणार असून, त्यात ५ स्लीपर क्लास, ११ जनरल आणि २ एस. एल. आर असे १८ डबे आहेत.

- औरंगाबाद- पंढरपूर- औरंगाबाद विशेष रेल्वे गाडी (क्र. ०७५१५) पूर्वी १३ जनरल, २ स्लीपर क्लास आणि आणि २ एस. एल. आरचे डबे जोडून धावणार होती, आता मात्र यात बदल करून ८ जनरल आणि ७ स्लीपर क्लास आणि २ एस.एल.आर चे डब्बे घेऊन जोडून धावणार आहे.

- नांदेड - पंढरपूर - नांदेड विशेष रेल्वे गाडी (क्र. ०७४९८) विशेष गाडी पूर्वी ४ स्लीपर क्लास, ३ जनरल, ६ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ०२ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ०१ प्रथम श्रेणी वातानुकूलित आणि २ एस. एल. आर असे १८ डबे घेऊन धावणार होती. आता ही रेल्वे ७ स्लीपर क्लास, २ जनरल, ५ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ०२ द्वितीय श्रेणी वातानुकूलित आणि २ एस.एल.आर असे १८ डब्बे घेऊन धावणार आहे.

असे आहे वेळापत्रक

जालना -पंढरपूर- जालना विशेष रेल्वे (क्र. ०७४६८) विशेष जालना स्थानकावरून ९ जुलै २०२२ रोजी सायंकाळी १९.२० वाजता निघेल आणि पंढरपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी (क्र. ०७४६९) १० जुलै रोजी रात्री २०.३० वाजता पंढरपूर स्थानकावरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता जालन्याला पोहोचेल. तर औरंगाबाद- पंढरपूर- औरंगाबाद (क्र. ०७५१५) ही रेल्वे ९ जुलै रोजी औरंगाबाद स्टेशनवरून रात्री २१.४० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी ११.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी (क्र. ०७५१६) पंढरपूर स्टेशनवरून १० जुलै रोजी रात्री २३.०० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी १२.२० वाजता औरंगाबादला पोहोचेल. त्याचप्रमाणे नांदेड- पंढरपूर- नांदेड विशेष रेल्वे (क्र. ०७४९८) नांदेड स्थानकावरून ९ जुलै रोजी दुपारी १५.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या दिशेने गाडी (क्र. ०७४९९) पंढरपूर स्टेशनवरून १० जुलै रोजी रात्री २१.३० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.५० वाजता नांदेडला पोहोचेल.

Web Title: Ashadi Ekadashi Special Train To Pandharpur Nanded Jalna Aurangabad Railway Stations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..