
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार गेली काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री, भाजपचे नेते खासदार अशोक चव्हाण यांना लक्ष्य करीत जोरदार टीका करीत आहेत. त्यावर चव्हाण यांनी रविवारी (ता. नऊ) उत्तर दिले. ‘मी भाजपचा मोठा नेता नाही, मी लहान कार्यकर्ता आहे, ते मोठे नेते आहेत’ असे म्हणत त्यांनी टीकाकारांना टोला लगावत त्यांची फिरकी घेतली.