

Intense fear across the entire area due to incident in Deolali shivar.
Sakal
आष्टी : आष्टी तालुक्यातील देवळाली (लोखंडी) शिवारातील सोनी पठार भागात शनिवारी (दि. ७) सकाळी वन्यप्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात बिबट्या की वाघ असा संभ्रम निर्माण झाला होता; मात्र हा हल्ला वाघानेच केल्याची अधिकृत पुष्टी वनविभागाने केली आहे. देविदास माणिक टकले (वय ४०, रा. देवळाली परिसर, ता. आष्टी) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, या घटनेमुळे देवळाली, लोखंडवाडीसह संपूर्ण तालुक्यात तीव्र भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे.