Milk Adulteration Case : सतीश शिंदेंना बीडच्या न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

आष्टीचे दूध भेसळीचे प्रकरण
Ashti milk adulteration case Satish Shinde granted anticipatory bail Beed court
Ashti milk adulteration case Satish Shinde granted anticipatory bail Beed courtsakal
Updated on

बीड : आष्टी पोलिस ठाण्यात दूध भेसळ प्रकरणात गुन्हा नोंद असलेले राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.
ता. १६ मार्च रोजी आष्टी येथील संभाजी नगर भागातील एका खोलीत दुधात भेसळीसाठी वापरण्यात येणारे पावडर व रसायनाचे डबे पोलिसांनी छापा टाकून ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी नंदू मेमाने यास अटक केली असून या प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्यावरही गुन्हा नोंद झाला होता. छाप्यात पावडरच्या १३२ गोण्या व रसायनाचे २२० डबे (किंमत नऊ लाख ९१ हजार रुपये) जप्त करण्यात आले होते.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष व जगदंबा मिल्क व मिल्क प्रॉडक्टसचे मालक सतीश शिंदे यांच्यावरही गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी सतीश शिंदे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एस. पाटील यांच्यासमोर सतीश शिंदे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. श्री. शिंदे यांच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरुन न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union Election
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
A Gangapur court rejected the anticipatory bail pleas of three accused in an alleged land grab case involving forged documents and also ordered an income tax inquiry into the matter.
Marathi News Esakal
www.esakal.com