Crime News : लॉटरीचालकावर प्राणघातक हल्ला

रांजणगाव शेणपुंजी येथे भर चौकातील घटना
Assault on head with sword lottery shop owner crime police
Assault on head with sword lottery shop owner crime policeesakal
Updated on

वाळूजमहानगर : धारदार तलवारीने डोक्यात प्राणघातक हल्ला केल्याने लॉटरीचालक एकजण गंभीर जखमी झाला. जखमीची प्रकृती चिंताजनक असून त्यास घाटीत दाखल करण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना वाळूज परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे शुक्रवारी (ता.१३) घडली.

रांजणगाव (शेणपुंजी) येथील योगेश शिवाजी म्हस्के (वय २६), रा.देवगिरी कॉलनी, रफिक शहा, बाळू चव्हाण असे जय भवानी हॉटेल शिवाजी पुतळ्याजवळ चहा पीत होते. तेथे शिवाजी म्हस्के व उमर शेख, मुक्तार शेख, महेश वेताळ, भाऊसाहेब वेताळ, सिकंदर पठाण यांच्यात वाद झाला.

मुख्य वर्दळीच्या चौकात आलेल्या या भांडणादरम्यान आरोपींनी योगेश म्हस्के यांच्या डोक्यात धारदार तलवारीने मारले. या घटनेत योगेश म्हस्के हा लॉटरीचालक गंभीर जखमी झाला. त्याला घाटीत रवाना करण्यात आले.

शुक्रवारी (ता.१३) झालेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

तसेच हा हल्ला करून फरार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहे. घटनेची नोंद वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास निरीक्षक संदीप गुरमे करीत आहेत.

आमदाराच्या पत्राला केराची टोपली

वाळूज औद्योगिक परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. त्यामुळे या परिसरात गुन्हेगारी वाढली आहे. यातूनच सामाजिक वातावरण धोक्यात येत असून अनेक दुष्परिणामकारक घटना घडत आहे. त्यामुळे वाळूज औद्योगिक परिसरातील अवैध धंदे बंद करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करण्याची लेखी पत्र गंगापूर खुलताबाद तालुक्याचे आमदार प्रशांत बंब यांनी पोलिसांना दिले होते. मात्र आमदाराच्या या लेखी पत्राला पोलिसांनी केराची टोपली दाखवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com