Agriculture loss in kalamb
sakal
कळंब - जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांसाठी विविध कागदपत्रे व माहितीची मागणी केली जात असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फरफट सुरू झाली आहे. प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची नोंद करण्याऐवजी फार्मर आयडी, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक तसेच जिओटॅगिंगचे फोटो आदी माहितीची पूर्तता करण्यावर भर दिला जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे.