esakal | हिंगोली एसीबीमधील सहाय्यक फौजदार माधव बुरकुलेंचा कोरोनामुळे मृत्यू

बोलून बातमी शोधा

हिंगोली पोलिस

हिंगोली एसीबीमधील सहाय्यक फौजदार माधव बुरकुलेंचा कोरोनामुळे मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वत्तसेवा

हिंगोली : कोरोनाचे संकट सर्वत्र सुरु असताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले विभागात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधव बुरकुले यांचा कोरोनामुळे शुक्रवारी (ता. २३) पहाटे मृत्यू झाला. हिंगोलीतील हा पोलिसाचा पहिला मृत्यू आहे.

जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पूर येथील माधव संभाजी बुरकुले ( वय ५४) हे परभणी जिल्हा पोलिस दलामध्ये सन १९८७ मध्ये भरती झाले होते. जिल्ह्याच्या निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्ह्यात बदलुन आले होते. जिल्हा पोलिस दलात काम करताना अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यामध्ये तपासात सहभाग नोंदवुन अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. मागील दिड वर्षापासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. सर्वत्र कोरोनाचे संकट सुरु झाले असतांना मागील सात ते आठ दिवसांपासुन त्यांना ताप येत असल्याने कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते.

वाशिम येथे त्यांना उपचारासाठी दाखल झाला करण्यात आले होते. परंतु प्रकृती कोरोनाचे अधिक खालावल्याने नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचाराकरीता हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने त्यांना नांदेड येथे नेण्यात आले होते. परंतु नांदेड येथे बेड उपलब्ध नसल्याने हिंगोली जिल्हा

शासकीय रुग्णालयाच्या कोव्हीड सेंटरमध्ये त्यांना दोन दिवसापुर्वी दाखल केले होते.

उपचार सुरु असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्हा पोलिस दलातील पहिल्या कोरोना योद्ध्याचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर हिंगोलीत कोरोनाचे नियम अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे