
वडवणी (जि. बीड) : वडवणी येथील न्यायालयात कार्यरत सहायक सरकारी अभियोक्ता ॲड.व्ही.एल. चंदेल (वय ४८) यांनी आपल्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २०) सकाळी दहाच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही.