जिंतूर - मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृणपणे त्यांची हत्त्या करण्यात आली. याप्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांचेवर कडक कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी समाजबांधवांनी गुरुवारी (ता. १९) तहसील कार्यालयावर आसूड मोर्चा काढला. .सरपंच संतोष देशमुख यांचे भर दिवसा अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने पूर्ण समाजमन ढवळुन निघाले असून, राज्यभरात असुरक्षिततेचे सावट पसरले आहे..घडलेल्या गुन्ह्याची व्याप्ती बघता कायद्याची अंमलबजावणी करणारे पोलिसच गुन्हेगाराना पाठीशी घालत आहेत शिवाय गुन्हेगारांवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्ह्यातील आरोपी आजही फरार आहेत. म्हणून घटनेचा निषेध करून गुन्ह्यातील सर्व आरोपीना अटक करावी..घटनेचा मुख्यसूत्रधार शोधावा, खून खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी भव्य आसूड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील मोर्चा बाजार समितीच्या मैदानांवरून मुख्य चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,बसस्थानक येथून राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत तहसील कार्यालया समोर मोर्चा धडकला यावेळी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले..यावेळी नागरिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत येत्या काही दिवसात सर्व आरोपी अटक झाले नाही तर आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.