नवरात्रीत घडला धक्कादायक प्रकार : महिला पोलिसावरच अत्याचार, गुन्हा दाखल

राजेश दारव्हेकर
Saturday, 24 October 2020

चक्क एका महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील सहा वर्षापासून अत्याचार करणाऱ्या युवकाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २४) दुपारी गुन्हा दाखल झाला. रक्षकालाच आरोपीने भक्षक बनविल्याने हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली. 

हिंगोली : सध्या नवरात्री सुरु असल्याने सर्वत्र महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते. वेगवेगळ्या कपड्यामध्ये महिलावर्ग दूर्गादेवीची आराधना करतात. या काळात महिलाचा सन्मान केल्या जातो. मात्र हिंगोलीमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली. चक्क एका महिला पोलिसाला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर मागील सहा वर्षापासून अत्याचार करणाऱ्या युवकाविरुद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २४) दुपारी गुन्हा दाखल झाला. रक्षकालाच आरोपीने भक्षक बनविल्याने हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली. 

हिंगोली येथील पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासोबत केशव दत्ता धाडवे (वय ३०) रा. लिंबी लोहरा (ता. हिंगोली) मैत्री जमविली. यातूनच पुढे दोघांचे प्रेमसंबध जुळले. हळूहळू या दोघांत लग्न करण्याच्या आणाभाका घेण्यात आल्या. हा प्रकार अनेकांना माहित असल्याने आता मझ्यासोबत लग्न कर म्हणून पिडीतेने तगादा लावला. यातून दोघांचे वाद होत असत. शेवटी या प्रकाराचा स्फोट झाला आणि पिडीत महिला पोलिसाने शहर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार ठाणेदाराला सांगितला. तिने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी केशव धाडवे याच्यावर शहर पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. २४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : मागणीच नसल्याने रंगीबेरंगी फुलांचा बेरंग

एवढेच नाही तर तिला ठार मारण्याची धमकी 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत २९ वर्षीय महिला पोलिस कर्मचारी हिंगोलीत कार्यरत असताना आरोपी केशव दत्ता धाडवे याने लग्नाचे अमिष दाखवून ता. एक एप्रिल २०१४ ते ता. तीन सप्टेंबर २०२० या दरम्यानच्या काळात सरस्वतीनगर आणि नविन पोलिस वसाहत, हिंगोली येथे तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. फिर्यादी महिलेने आरोपीकडे लग्नाची मागणी केली अ‍सता, तू आमच्यापेक्षा हलक्या जातीची आहेस, तुझ्याशी लग्न केले तर मला समाजात मान मिळणार नाही असे म्हणून लग्नास नकार दिला. एवढेच नाही तर तिला ठार मारण्याची धमकी दिली. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच तीने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. यावरुन हिंगोली शहर पोलिस ठाण्यात अत्याचार, अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमूख करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities Against Women Police Crime Filed Hingoli News