पारध - जुन्या वादातून एकाला लोखंडी रॉड चुलीत तापवून अंगाला अनेक ठिकाणी चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकारणी पारध पोलिसांनी आणखी दोन संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा एका राजकीय पक्षांचा तालुका प्रमुख मात्र फरारी आहे. या प्रकरणामुळे भोकरदन तालुक्याचे नाव राज्यात झाले आहे. तर ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे.
या प्रकरणाची माहिती अशी की, अन्वा (ता. भोकरदन) येथील कैलास गोविंदा बोराडे (वय-35) यांना (ता. 26) फेब्रुवारीला महाशिवरात्रच्या दिवशी जानेफळ गायकवाड रस्त्यावरील वटेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेलो असता, जुन्या वादाच्या कारणावरून सोनू उर्फ भागवत सुदाम दौड, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा एका राजकीय पक्षांचा तालुका प्रमुख नवनाथ दौड या दोघां भावांनी लोखंडी रॉड गरम करून अंगाला, हातापायावर, मानेला चटके देऊन गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
अशा फिर्यादीवरून पारध पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा नोंदविला. असून, सोनू उर्फ भागवत सुदाम दौड याला ताब्यात घेऊन तो पाच दिवसाच्या पोलिस कोठडीत आहे. तर नवनाथ सुदाम दौड हा मात्र फरारी असून, आरोपीला शोधण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व पारध पोलिस ठाण्याच्या वतीने दोन पोलिस पथकाची स्थापना करण्यात आली. असून,बुधवारी (ता. 5) रात्री उशिरा अन्वा येथून गंगाधर काळे, रामू काळे या दोन संशयित आरोपीना अटक करण्यात आली असून, या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता दिसत आहे.
अंगाला गरम लोखडी रॉडणे चटके देऊन गंभीर जखमी केलेले शेतकरी कैलास गोविंदा बोराडे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे.
अन्वा प्रकरणात शेतकऱ्यास ज्या अमानुषपणे गरम रॉड करून अंगाला चटके देऊन जीवे मारण्याच्या प्रयत्न करण्याचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे अक्षरशः अंगाला काटा येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.