Loksabha Election Voting
Loksabha Election Votingsakal

Loksabha Election Voting : बोगस मतदानाचा प्रयत्न

बुढीलेन, ज्युबली पार्क येथे ‘रिन फॅब्रिक व्हॉइटनर, अत्तर जप्त,केमिकल लावून शाई पुसणारे सहा जण पोलिसांच्‍या ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: बोगस मतदानासाठी बोटाला लागलेली शाई काढण्याकरिता डिटर्जंट पावडरचा आणि अत्तरचा वापर करणाऱ्या सहा जणांना पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संशयित आरोपींच्या ताब्यातून ‘रिन फॅब्रिक व्हॉइटनर आणि एक अत्तराची बाटली जप्त करण्यात आली. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात कलम १७१ (ड) ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे हे दुपारी पथकासह शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी बुढीलेन, सागर ऑप्टिकल्सजवळ तवक्कल पान सेंटरच्या समोर दुपारी पावणेबाराला आणि ज्युबली पार्क भागातील एमएसईबी येथील मतदान केंद्राच्या बूथबाहेर काही तरुण बोगस मतदानाच्या तयारीत असून, यासाठी केमिकलचा वापर करीत असल्याची माहिती मिळाली.

यावरून उपायुक्त बगाटे यांनी मतदान केंद्राबाहेरील बूथ गाठले. दोन्ही ठिकाणी मिळून सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये शेख मोबीन शेख जलील अहेमद (वय ३५, रा. शहा कॉलनी, उस्मानपुरा), सय्यद साजीद सय्यद साबेर (वय २७, रा. सागर हॉटेलमागे, बुढीलेन), अनिस खान मसूद खान (वय ४१, रा. जंजीरा हॉटेलसमोर, बुढीलेन), सय्यद सलाउद्दीन शकुर सालार (वय ३९, रा. बुढीलेन), तारेख बाबू खान (वय २३, रा. बारापुल्ला किंग बेकरीजवळ, मिल कॉर्नर) आणि मुद्दसीर इमरान खान (वय १९, रा. कोतवालपुरा) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बॉटल ज्यावर रिन फॅब्रिक व्हॉइटनर असे नमूद असलेले आणि एक अत्तराची बाटली आढळली. जमादार प्रेमसिंग चव्हाण यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा होत होता वापर

या आरोपींकडून जप्त केलेल्या केमिकलचा वापर हे आरोपी बोटाला लावलेली शाई पुसण्यासाठी करीत असल्याचे दिसून आले. पोलिस उपायुक्त बगाटे यांनी तपासणी केली असता आरोपीच्या बोटाची शाई पुसलेली आढळून आली. यानंतर यांना ताब्यात घेण्यात आले.

काय आहे कलम १७१ ड?

भारतीय दंड विधानाच्या या कलमामध्ये जी व्यक्ती बोगस मतदानासाठी प्रयत्न करेल, अशी व्यक्ती शिक्षेस पात्र असेल. यामध्ये हा गुन्हा जामीनपात्र असून, यामध्ये तीन ते सहा महिन्यांचा कारावास तसेच दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com