esakal | Hingoli Rain: औंढा तलाव ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकरी सुखावले
sakal

बोलून बातमी शोधा

aundha lake

Hingoli Rain: औंढा तलाव ओव्हरफ्लो, परिसरातील शेतकरी सुखावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-दतात्रय शेगुकर

औंढा नागनाथ (हिंगोली): औंढा शहर व तालुक्यात सोमवारी दिवसभर व रात्री झालेल्या जोरदार पावसाने औंढा येथील तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावातील पाणी मंगळवारी ता.सात ओसंडून वाहत होते. याचा लाभ शहरातील पाणी पुरवठ्यासाठी होणार असल्याने नागरिक समाधानी झाले आहेत. औंढा शहर व परिसरात मागच्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने नदी, नाले, ओढे,बंधारे तुडुंब भरले आहेत. सोमवारी झालेल्या जोरदार पावसाने शहरातलगत असलेला औंढा तलाव शंभर टक्के भरला असून तो ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावातून पाणी ओसंडून वाहत आहे.

या तलावातून शहरात पाणी पुरवठा केला जातो. आता हा तलाव शंभर टक्के भरला असल्याने औंढा शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. तसेच हा तलाव भरल्याने तलावाच्या परिसरात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी, बोअरवेल व शेततळ्याच्या पाणी पुरवठ्यासाठी देखील लाभ होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकासह शेतकरी देखील समाधानी झाले आहेत. या तलावाच्या परिसरात औंढा शहराचा काही भाग तसेच वगरवाडी, वगरवाडी तांडा या भागातील शेती देखील सिंचनाखाली येते. औंढा नागनाथ शहर व तालुक्यांमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे औंढा नागनाथ तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.

हेही वाचा: 'औरंगाबादेत ‘एम्स’, ‘आयआयटी’ उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार'

दरम्यान मागच्या पंधरा दिवसांपूर्वी देखील झालेल्या पावसाने हा तलाव ओव्हरफ्लो झाला होता. या वर्षीच्या पावसाळ्यात दोन वेळा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. याचा लाभ नागरिकांसह शेतकऱ्यांना होणार असल्याने ते समाधानी झाले आहेत.

loading image
go to top