औंढा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर महिलाराज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Marathwada : औंढा तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर महिलाराज

औंढा : तालुक्यामध्ये सात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी (२०) सकाळी दहा वाजता जाहीर झाला. यात चार गावच्या सरपंच पदावर महिलांची वर्णी तर तीन ग्रामपंचायतींवर पुरुषांची वर्णी लागली आहे. रविवारी झालेल्या निवडणुकीत गोजेगाव, रामेश्वर, उखळी, उंडेगाव, मूर्तिजापूर (सावंगी), शिरडशहापूर, सारंगवाडी या सात ग्रामपंचायतींचा समावेश होता.

यामध्ये गोजेगाव येथील सरपंचपदी वर्षा अच्युतराव नागरे, रामेश्वर येथील सरपंचपदी शिलाबाई सुधाकर जाधव, उखळी येथील सरपंचपदी सुचिता पुंडलिक गायकवाड, उंडेगाव येथील सरपंचपदी बेबीताई विलास इंगोले तर मूर्तीजापूर सावंगी येथील सरपंचपदी विशाल भगवान मस्के, शिरडशहापूर येथील सरपंचपदी यशवंत गणेश रावळे, सारंगवाडी येथील सरपंचपदी शिवाचार्य शिवलिंग गुरु काशिनाथ निवडून आले.

तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक नायब तहसीलदार सचिन जोशी, अव्वल कारकून शैलेश वाईकर, उमाकांत मुळे यांनी निवडणुकीचे नियोजन केले होते. निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी छत्रपती चव्हाण, गंगाधर गिणगीने, नितीन हजारे, हनीफ खान पठाण, अशोक फोपसे, सचिन कोकडवार यांनी काम पाहिले. कुरुंदाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन मोरे व औंढ्याचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे, सहायक पोलिस निरीक्षक अनिल लांडगे, पोलिस उपनिरीक्षक मुंजाजी वाघमारे पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्ता ठोंबरे, पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा वाळके यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.