

Devgaon Rangari Police seized illegal gutkha worth ₹5.18 lakh, including a car, during a raid in Aurali village of Kannad taluka.
Sakal
देवगाव रंगारी : महाराष्ट्रात बंदी असलेला सुगंधी पानमसाला आणि गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरुद्ध देवगाव रंगारी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. औराळी (ता. कन्नड) येथे मंगळवारी (ता. ४) रात्री टाकलेल्या छाप्यात १ लाख १८ हजार ५८२ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली ४ लाख रुपयांची कार असा एकूण ५ लाख १८ हजार ५८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.