Aurangabad: भाईगिरीतून घेतला बळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime
भाईगिरीतून घेतला बळी

औरंगाबाद : भाईगिरीतून घेतला बळी

औरंगाबाद : भाईगिरीतून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोघांत वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याचा चक्क १०० वार करुन खून केल्याचा तसेच डोळे काढून रस्त्यावर गोट्या खेळल्याचा प्रकार १० नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, ज्याचा खून करण्यात आला तो मृत अबू बकर हबीब चाऊस (४१, रा. न्यू एस टी कॉलनी, कटकट गेट) हा आणि त्याचा मारेकरी सय्यद समीर ऊर्फ स्टायलो हे दोघेही रेकार्डवरील गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. स्टायलोने अबू बकरचा ९ नोव्हेंबरच्या रात्री खून करुन त्याचा मृतदेह जळगाव रस्त्यावरील एका कारच्या शोरुमजवळील झाडाझूडपात टाकला होता.

दरम्यान त्याची ओळख पटताच त्याच्यासोबत कोण कोण होते, याची माहिती काढल्यानंतर पोलिस अबू बकरच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान आरोपी स्टायलो याचा मोबाईल मृत अबू बकरने घेतला होता, त्यावेळी आरोपी स्टायलोच्या आईचा फोन आला, मात्र मोबाईलवर बोलण्यासाठी न दिल्याने स्टायलो संतप्त झाला होता. यातून त्याने अबू बकरचा गळा घोटला. दोघांचे रेकॉर्ड तपासले असता, अबू बकर हा व्यापाऱ्यांना चाकूने धमकावून पैसे घेणे, मारहाण करणे असे प्रकार करत असे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

तर आरोपी स्टायलो याचा घरफोड्या करण्याचा आलेख वाढता होता. सिडकोतील डॉक्टरचे घर फोडल्याच्या प्रकरणात तो हर्सूल कारागृहातून बाहेर आला होता. आरोपी स्टायलो याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने स्टायलो याला शनिवारपर्यंत (ता.१३) पोलिस कोठडी सुनावली.

loading image
go to top