आता वेध जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षणाचे

मधुकर कांबळे 
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

0 विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार महिन्यांची मुदत वाढवून दिल्याने विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची मुदत संपण्यासाठी आणखी तीन महिने शिल्लक आहेत. 
0 मंगळवारी निघणार मंत्रालयात आरक्षणाची सोडत 
0 सर्वाधिक भाजपचे 23 सदस्य निवडून आले होते.गेल्या टर्ममध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून येवूनही त्यांना अखेरपर्यंत अध्यक्षपदापर्यंत पोहचता आले नसल्याचे शल्य शेवटपर्यंत बोचत राहिले आहे.

औरंगाबाद -  महापालिकेच्या महापौरपदाच्या सोडतीनंतर आता ग्रामीण भागात दबदबा वाढवणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या आरक्षणपदाचे वेध लागले आहेत. विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षांना निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार महिन्यांची मुदत वाढवून दिल्याने विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची मुदत संपण्यासाठी आणखी तीन महिने शिल्लक आहेत. सोडतीची तारिख जाहीर झाली असून मंगळवारी (ता.19) सकाळी 11.30 वाजता मंत्रालयात सोडत होणार आहे. यामुळे आता कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण सुटेल याचे अंदाज बांधले जात आहेत. 

हेही वाचा : बायको छळते ? इथे मिळेल आधार 

आतापर्यंत सुटले असे आरक्षण 

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आतापर्यंत खुला प्रवर्ग, ओबीसी महिला, खुला प्रवर्ग महिला आणि ओबीसी पुरुष यांच्यासाठी सुटले होते. विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर ओबीसी महिला प्रवर्गातुन अध्यक्ष झाल्या आहेत. तसेच यापुर्वी ओबीसी महिला प्रवर्गातुन नाहिदा बानो, शारदा जारवाल, खुला प्रवर्ग महिलामधून लता पगारे तर खुल्या प्रवर्गातुन श्रीराम महाजन आणि ओबीसी पुरुष प्रवर्गातुन राजेंद्र ठोंबरे अध्यक्षपदी विराजमान झाले होते. विद्यमान अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांची मुदत 21 सप्टेंबर रोजी संपली , मात्र या काळात अन्य निवडणुकांची प्रक्रियासुरु होती. यामुळे राज्य शासनाने अध्यक्षपदाला 22 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सध्या जिल्हा परिषदेच्या 62 गटातुन सदस्य निवडून आले आहेत. 

हेही वाचा : शरीराचे तुकडे तुकडे करुन कुपनलिकेत कोंबले, मुंडके मात्र... 

अखेरपर्यंत भाजपला बोचत राहिले शल्य 

औरंगाबाद तालूक्‍यातील 10, गंगापुर तालूक्‍यातील 9, सिल्लोड, कन्नड तालूक्‍यातील प्रत्येकी 8, वैजापुर तालूक्‍यातील 7 , सोयगाव तालूक्‍यातील 3 तर फुलंब्री आणि खुलताबाद तालूक्‍यातील प्रत्येकी 4 जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामध्ये सर्वाधिक भाजपचे 23 सदस्य निवडून आले होते. शिवसेनेचे 19 सदस्य निवडून आले होते तर कॉंग्रेस 16, राष्ट्रवादी कॉंग्रेस 2 आणि मनसे व रिपाइं (डेमोक्रॅटीक) प्रत्येकी एक अशी सदस्य संख्या होती मात्र असे असतानाही अध्यक्षपदापासून भाजपला दूर रहावे लागले होते. जास्त जागा जिंकल्यानंतरही शिवसेना व कॉंग्रेसची आघाडी झाली आणि अध्यक्षपद शिवसेनेकडे तर कॉंग्रेसकडे उपाध्यक्षपद आले. आता जिल्हा परिषदेतील कित्ता आता राज्यात गिरवला जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : तरुणी - महिलांना छेडता का बेट्यांनो ? घ्या मग आता... 

गेल्या टर्ममध्ये जिल्हा परिषदेत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून येवूनही त्यांना अखेरपर्यंत अध्यक्षपदापर्यंत पोहचता आले नसल्याचे शल्य शेवटपर्यंत बोचत राहिले आहे. आता यापुढेही शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. येत्या मंगळवारी (ता.19) अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत मंत्रालयातील सातव्या मजल्यावरील परिषदेच्या सभागृहात सकाळी 11.30 वाजता होणार असल्याचे ग्रामविकास खात्यातर्फे जिल्हा परिषद अध्यक्षांना कळवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगीतले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad  Zilla Parishad chairman reservetion