औरंगाबादमधील ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

money scam
औरंगाबादमध्ये ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

औरंगाबादमध्ये ३०-३० घोटाळा; शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

sakal_logo
By
सुधीर काकडे

औरंगाबाद: २१ दिवसांत पैसे डबल..! अशी प्रलोभन देत मोठे घोटाळे झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील. मराठवाड्यातून अशीच घटना समोर येत असून, एका औरंगादह मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना भरगोस नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत लुबाडल्याची घटना समोर आली आहे. औरंगाबाद, पैठण परीसरातील शेतकऱ्यांकडून कोट्यवधी वसूल करून फरार झालेल्या एका घोटाळेबाजविरोधात आता औरंगाबादमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांचा संप ; तेरा कर्मचारी निलंबित

गुंतवणूक करा आणि काही दिवसांत गुंतवणूकीच्या थेट ३० टक्के परतावा मिळवा अशी प्रलोभनं देत मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना संतोष उर्फ सुनिल राठोड नावाच्या आरोपीने चुना लावला. यामुळेच या प्रकरणाला ३०-३० असं नाव पडलं. सुरूवातील आरोपीने अनेकांना मोठा परतावा दिला, यावेळी तो गाड्यांचा ताफा आणि मोठ-मोठ्या पोत्यांमध्ये पैसे घेऊन गावात येत होता असंही सांगितलं जातंय. काही लोकांना परतावा दिला आणि मोठ्या प्रमाणात त्याची चर्चा झाल्याने अनेकांनी कर्ज घेऊन, घर विकून तब्बल १० लाखांपर्यंत गुंतवणूक केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पैठणमधील एका गुतवणूकदाराने तक्रार केली असून, पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात केली आहे.

हेही वाचा: वाळूचोरी प्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा

कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्यात एका १० लाख रुपये गुंतवणूक दाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांना दिली. तसेच या प्रकरणात दोन लोकांना ताब्यात घेतलं असून, या प्रकरणात लोकांनी समोर येऊन तक्रारी कराव्या असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

loading image
go to top