esakal | जालन्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या; माजी राज्यमंत्री खोतकर यांची घटनास्थळाला भेट

बोलून बातमी शोधा

jalna crime.}

तसेच घटनास्थळी काही दगडांवर व रूमालावर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना दिसून आले

जालन्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या; माजी राज्यमंत्री खोतकर यांची घटनास्थळाला भेट
sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना: जालना तालुक्यातील सेवली-नागापूर या आडमार्गी रस्त्याच्या दरीत जळालेल्या कारमध्ये पुरूष जातीचा हाडांचा सापळा सोमवारी (ता.आठ) सकाळी आढळून आला आहे. कारसह घटनास्थळी सापडलेल्या पाकिटातील कागदपत्रावरून हा जळालेला मृतदेह शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके (रा.पाहेगाव, ता.जालना) यांचा असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान खून करून कारमध्ये मृतदेह ठेवून कार व मृतदेह जाळण्यात आल्याचा पोलिसांकडून प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील सेवली-नागापूर या आडमार्गी रस्त्याच्या दरीत एक कार जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती सेवली पोलिसांनी सोमवारी (ता.आठ) सकाळी मिळाली. त्यानुसार सेवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पाहणी केली असता, कारमध्ये पुरुष जातीचा हाडांचा सांगळा दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहिणी केल्यानंतर एक पाकीट पोलिसांनी मिळून आले. पाकिटातील कागदपत्रावरून हा मृतदेह शिवसेनेचे कार्यकर्ते रमेश शेळके (रा. पाहेगाव ता.जि. जालना) यांचा असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

धक्कादायक! अवघ्या एकोणीसशे रुपयासांठी खून; करडखेलच्या `त्याʼ खुनाचे गूढ उकलले

तसेच घटनास्थळी काही दगडांवर व रूमालावर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यामुळे रमेश शेळके यांची हत्या करून त्यांचा मृतदेह कारमध्ये ठेवून कारसह मृतदेह जाळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. दरम्यान घटनास्थळी शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेटी दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच परतूरचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, सेवली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास  मोरे, मंठा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नितीन गुड्डेवार यांच्यासह पोलिस अधिकारी-कर्मचारी, फिंगर प्रिंट पथक, डॉग स्कॉड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह हा चालकाच्या सीटवर झोपलेल्या अवस्थेत आहे. चालकाच्या सीटवर जळालेल्या सांगड्याचे डोके आहे, तर चालक सीटच्या बाजूला असलेल्या सीटच्या दिशेला हाडाच्या सांगड्याचे पाय असल्याचे दिसून आल्याचे पोलिसांकडून  सांगण्यात आले आहे.

पाचोड - पैठण रस्त्यावर अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर

दरीत उतरतांना  सहाय्यक पोलिस निरीक्षक जखमी 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सेवली पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मात्र, ही कार दरीत असल्याने घटनास्थळी जातांना सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास मोरे हे घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जालना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(edited by- pramod sarawale)