esakal | CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada Corona Updates

आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

CoronaUpdates: मराठवाड्यात कोरोनाचे ७६ बळी, औरंगाबादेतील १९ जणांचा समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनामुळे ७६ जणांच्या मृत्यूची बुधवारी (ता. ३१) नोंद झाली. त्यात नांदेडमध्ये २४, औरंगाबादेत १९, बीड ९, जालना ७, हिंगोली ६, लातूर ५, परभणी ४ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे.ताडपिंपळगांव (ता. कन्नड) येथील पुरुष (वय ६५), गारखेड्यातील भारतनगरातील महिला (३७), बीड बायपास भागातील महिला (६५), फुलंब्री येथील पुरुष (३३), प्रगती कॉलनीतील पुरुष (६५), पैठण येथील पुरुष (५५), भावसिंगपूरा भागातील पुरुष (७२) उस्मानपूरा भागातील पुरुषाचा (६०) घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.श्रेयनगरातील पुरुष (७४), गजानन कॉलनीतील पुरुष (७५), खंडाळा (ता. वैजापूर) येथील पुरुषाचा ( ६७) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
मजनू हिल भागातील पुरुष (७०), नागेश्वरवाडीतील पुरुष (८५), सिडको एन-४ मधील महिला (८३), उल्कानगरीतील महिला (६८), एकनाथनगरातील पुरुष (६२), बसैयेनगरातील पुरुष (७७), हेडगेवार रुग्णालय परिसरातील पुरुष (७९), जटवाडा भागातील महिलेचा (७०) खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.


औरंगाबादेत वाढले १५४२ रुग्ण
जिल्ह्यात बुधवारी (ता.३१) दिवसभरात १५४२ कोरोनाबाधित आढळले. त्यात १ हजार ९० रुग्ण शहरातील तर ४५२ जण ग्रामीण भागातील आहेत. बरे झालेल्या आणखी १२२० जणांना सुटी देण्यात आली.रुग्णांची संख्या ८२ हजार ६७९ वर गेली आहे. आतापर्यंत ६५ हजार ४३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १५ हजार ५७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १ हजार ६७० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. दरम्यान, मराठवाड्यातील उर्वरित सात जिल्ह्यांत ३ हजार ४६७ रुग्णांची भर पडली. त्यात नांदेड १०७९, लातूर ६०६, जालना ५३२, परभणी ४९८, बीड ३२५, उस्मानाबाद २५३, हिंगोली जिल्ह्यातील १७४ जणांचा समावेश आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image