esakal | देऊळवाडी खून प्रकरणातील तीन महिला आरोपीना जामीन मंजूर
sakal

बोलून बातमी शोधा

court news.jpg

हेतुपुरस्पर व द्वेष बुद्धीने अर्जदारांची नावे पुरवणी अहवालात घेण्यात आली. त्यामुळे अर्जदार हे अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी पात्र आहेत.

देऊळवाडी खून प्रकरणातील तीन महिला आरोपीना जामीन मंजूर

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : देऊळवाडी (ता. उदगीर) येथील बालाजी गताटे व गंगाधर गताटे या भावकीतील कुटुंबामध्ये शेतात जेसीबीच्या साहाय्याने कालवा काढण्याच्या कारणावरून वाद होता. त्यामुळे एक मे रोजी त्यांच्यामध्ये काठ्या कुऱ्हाडीने मारहाण झाली होती. सदर भांडणात रुद्रप्पा गताटे यांचा येथील सरकारी दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यु झाला. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

त्या विरुद्ध तक्रारदार सतीश गताटे यांनी प्रताप गताटे व इतर अकरा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला. त्या विरुद्ध प्रभावती, आशा व रेखा गताटे यांनी उदगीर येथे सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळणेबाबत अर्ज दाखल केला होता. परंतु गुन्ह्याचे गंभीर स्वरूप असल्याचे कारण देत सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळुन लावला. त्यानंतर त्यांनी अ‍ॅड. कृष्णा रोडगे यांच्या मार्फत मुबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीन मिळणे बाबत याचिका दाखल केली होती. 

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

सदर याचिकेवर १३ ऑगस्ट रोजी सुनावणी आली असता अर्जदारांच्या वकिलांनी प्रतिपादन केले की, अर्जदार यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभाग नव्हता. तसेच गुन्हा घडला तेव्हा अर्जदार हे गुन्ह्याच्या ठिकाणी हजरही नव्हते. तसेच त्यांचे FIR मध्ये नावे सुद्धा नव्हती. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

परंतु घटनेच्या दुसऱ्या दिवशी हेतुपुरस्पर व द्वेष बुद्धीने अर्जदारांची नावे पुरवणी अहवालात घेण्यात आली. त्यामुळे अर्जदार हे अटकपुर्व जामीन मिळण्यासाठी पात्र आहेत. या वरील बाबी विचारात घेऊन उच्च न्यायालयाने अर्जदारांचा अटकपुर्व जमीन मंजुर केला अशी माहीती अँड. रोडगे यानी दिली आहे.
(संपादन-प्रताप अवचार)

loading image