esakal | Aurangabad : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण
sakal

बोलून बातमी शोधा

abdul sattar

Aurangabad : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत जिल्हातील २० प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी टाईप बी रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (ता.११) ग्रामविकास महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, उपाध्यक्ष एल.जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बंलाडे, आरोग्य व शिक्षण सभापती गलांडे पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमअंतर्गत आमदार अब्दुल सत्तार - ४, आमदार रमेश बोरनारे-७, आमदार हरिभाऊ बागडे-४, १४ वा वित्त आयोगाच्या ग्रामपंचायत स्तरावरील व्याजाच्या रक्कमेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी २०, सार्वजनिक आरोग्य विभाग -९, डॉ. शामा प्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन योजना-१, जिल्हा परिषद उपकर योजना-१ असे जिल्हातील ५१ प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५० नविन रुग्णवाहिका देण्यात आल्या.

loading image
go to top