Aurangabad: घाटीच्या आयसीयूत पंधरा मिनिटे वीज गूल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ghati hospital at aurangabad
घाटीच्या आयसीयूत पंधरा मिनिटे वीज गूल, रुग्णांचा श्‍वास मुठीत, प्रयत्नांनी पुन्हा श्‍वास सूरू

औरंगाबाद : घाटीच्या आयसीयूत पंधरा मिनिटे वीज गूल

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मेडीसीन बिल्डींगमधील ‘एमआयसीयू’त बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेपाचच्या सूमारास अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. वीज गेल्यानंतर जनरेटरचा बॅकअप असतानाही ते ऐनवेळी सुरू न झाल्याने दहा ते पंधरा मिनिटे तेथे उपचार घेणाऱ्या रूग्णांचा श्‍वास अडकला. पण तातडीने सूत्रे हलवित कार्य पार पाडत ‘यूपीएस’चा आधार घेण्यात आला व नंतर जनरेटर सूरू झाल्यानंतर रूग्ण, नातेवाईकांसह सर्वांनीच सूटकेचा निःश्‍वास टाकला.

या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. घाटीच्या मेडीसीन बिल्डींगमध्ये बुधवारी सायंकाळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाला. मेडीसीन बिल्डींगला आपत्कालीन परिस्थितीत जनरेटरचे बॅकअप आहे. पण तांत्रिक कारणांमुळे ते ऐनवेळी सुरू झाले नाही. परंतू ‘एमआयसी’मध्ये प्रत्येक खाटेला ‘यूपीएस’चा सप्लाय देण्यात आला आहे. त्यावर सर्व व्हेंटीलेटर चालतात. एका खाटेचा ‘युपीएस’ सप्लाय बंद होता, पण काही वेळाने तोही सुरू करण्यात आला. या काळात मेडीसीन बिल्डींगमध्ये डॉक्टर्स उपस्थित होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

त्यांनी तातडीने इतर सहकाऱ्यांची व रूग्णांच्या नातेवाईकांची मदत घेतली. व्हेंटीलेटर्सला बॅकअप असल्याने त्याचा उपयोग करून व्हेंटीलेटर्स सूरूच राहतील यासाठी कटाक्षाने प्रयत्न करून तेथील प्रत्येक रूग्णांकडे प्रकृतीच्या दृष्टीने लक्ष देण्यात आले. एक-दोन रूग्णांना हाताने पंपींग द्यावे लागले. वीज बंद असल्याच्या काळात एक दोन रूग्णांना त्रास झाला.

या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्वच खाटांना ‘यूपीएस’चा सप्लाय देण्यात आला आहे. या घटनेत कोणत्याही रूग्णांचे नुकसान झाले नाही. संपुर्ण टीम तेथे असल्याने तात्काळ काळजी घेत आपत्ती निवारण करण्यात आले.

loading image
go to top