थंडी येतेच कशी ! 

थंडी येतेच कशी ! 

औरंगाबाद - थंडी पडली की शेकोट्या पेटतात, गाठोड्यात, ट्रंकमध्ये कोंबून ठेवलेल्या कानटोप्या, मफलर, स्वेटर बाहेर निघतात. वयोवृद्धांच्या अंगावरुन तर सुर्य वर येईपर्यंत चादर निघत नाही. आज खूप थंडी वाजतेय असे जो तो म्हणत असतो पण ही थंडी येते कशी हा प्रश्‍न आहे. कुणी म्हणतो कुठं तरी बर्फ पडलाय तर कोणी म्हणतो पाउस पडला असेल. पण थंडी येते कशी याविषयी जाणुन घेतले असता भौगोलिक वातावरणाच्या अभ्यासकांनी खास " सकाळ 'च्या वाचकांसाठी सांगीतलेल्या थंडीविषयीच्या माहितीनुसार हवेत गारवा नेहमीच असतो फक्‍त तो उचल खातो तो सुर्याची उष्णता कमी व्हायला लागतो तेंव्हा हा गारवा उचल खातो. तेंव्हा आपण सर्वजण म्हणतो थंडी पडली. 

तीन ऋतुंपैकी हिवाळयाचे चार महिने. साधारणत: ऑक्‍टोबरपासून हिवाळा ऋतूची सुरुवात होते. इथे मंगळवार (ता.17) पासून हवेतील गारठा तीव्र झाला आहे. मंगळवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने थंडीची तीव्रता जास्त जाणवली ती रात्रीपर्यंत कायम होती. नुसती थंडी असेल तेवढ्यापुरती सहन केली जाऊ शकते; परंतु मंगळवारी थंडीच्या जोडीने ढगाळ वातावरण होते. यामुळे थंडी जास्त जाणवत होती. घराबाहरे पडणाऱ्या बहुतांश लोकांनी उबदार कपडे घातले होते. संध्याकाळी काही ठिकाणी शेकोट्या पेटवून शेकत बसलेले लोक दिसत होते.

कशी येते थंडी? 

थंडी वाजते असे आपण म्हणतो; मात्र ही थंडी नेमकी काय असते याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, ""पृथ्वी नैसर्गिकरीत्या साडेतेवीस अंशांनी कललेली असून, तिचा अक्ष ऋतुनिर्मिती करीत असतो. ज्यावेळी सूर्याची किरणे पृथ्वीच्या भूपृष्ठावर येतात विशेषत: महाराष्ट्र, भारताचा विचार केला तर ती तिरपी येतात. त्यामुळे भूपृष्ठावरील उष्णतेत आपोआप घट होत असते. उष्णतेत घट झाल्याने हवेत असलेला गारवा आपोआप जाणवायला लागतो. थंडी जाणवायला लागते. त्यालाच हिवाळा म्हणतात. त्याशिवाय नैऋत्य मॉन्सून उत्तरेकडे गेल्यानंतर तो पुन्हा परत जाताना सोबत शीतलहरी घेऊन जात असतो. त्यामुळे दख्खनच्या पठारावर चार महिने सातत्याने राहतात त्याचा परिणाम थंडी वाढण्यात होत असल्याचे ते म्हणाले. 

हे आणतात थंडीत अडथळा 

ज्या देशाच्या तिन्ही बाजू पाण्यानी वेढलेल्या असतात त्या देशाला द्विपकल्प म्हणतात. आपला देशही असाच एक द्विपकल्प आहे. तिन्ही बाजूंनी समुद्र वेढलेला आहे. या द्विपकल्पाचे वैष्ट्यि, की दोन्ही बाजूंनी वादळे निर्माण होऊ शकतात. ही वादळे भूपृष्ठावरच येऊन थांबतात. हिवाळ्याच्या चार महिन्यांत एखादा जरी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन अरबी समुद्र असो किंवा पश्‍चिम बंगालचा उपसागर या दोन्हींत वादळे निर्माण झाले तर हे नैसर्गिक थंडीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ""मराठवाड्यातील मानवी जीवनासाठी 24 ते 27 अंश सेल्सिअस पारा पूरक समजला जातो. तर साधारणत: 10 ते 15 अंश सेल्सिअस पारा असेल तर खूप थंडी समजली जाते. रक्‍तदाब नियमित असणे गरजेचे आहे; तसेच ऋतुचक्रही नियमित असले पाहिजे.

होऊ शकतात आजार 

वर ढगाळ वातावरण आणि जमिनीवर थंडी असेल तर मानवी शरीरात आजार होऊ शकतात. मानवी शरीराच्या नैसर्गिक तापमानापेक्षा वातावरणाचे तपमान कमी झाले तर त्याचा परिणाम मानवी शरीरावर नक्‍की होतो. विशेषत: लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना, वृद्धांना याचा त्रास होऊ शकतो, असे मतही डॉ. सूर्यवंशी यांनी व्यक्‍त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com