
चोरट्यांनी सोयाबीन व्यापाऱ्याला धारूरजवळ केली बेदम मारहाण
किल्लेधारूर : शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसाखालीच किराणा दुकान फोडीची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री येथील व्यापारी मारुती गायके केज वरून धारूरला येत असताना अज्ञात चोरट्यांनी शहराच्या जवळच असलेल्या कासारफारटीजवळ चोरीच्या उद्देशाने रस्त्यावर आडून कोयत्याने अंगावर वार करत हात पाय बांधून फेकून दिल्याची घटना घडली आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटनांत वाढ होत असतानाच,येथील व्यापारी यांना अज्ञात चोरट्यानी चोरीच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे आहे सविस्तर असे की मारुती गायके केज वरून धारूर ला येत असताना केज व धारूर च्या मधोमध असलेल्या धारूर शिवारातील कासारपाटी रस्त्यावर अज्ञात चोरट्यांनी चोरीच्या उद्देशाने मारुतीला गाटून कोयत्याने वार केले हात पाय बांधून रस्त्याच्या कडील फेकलं असल्याचे निदर्शनास आले.
मारुती त्यांच्या मेव्हण्याने अकरा वाजता फोन लावला असता ते तांबवा फाटा येते आहे असे सांगितले वेळ झाला तरी घरी पोहचले नसल्याने मारुती यांच्या मेव्हण्याने त्यांच्या मित्रांना फोन लावून सांगितले दहा पंधरा जनां सहित पोलिसांशी सम्पर्क साधला पोलीस व मित्रांनी शोध घेतला असता कासाफाटी येथे रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले ते बेशुद्ध अवस्थेत असल्याने उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले असून पुढील तपास धारूर पोलीस कर्मचारी करत आहेत सध्या ही मारुती गायके बेशुद्ध अवस्थेत असून पोलीस अंबेजोगाई येथेच आहेत..
Web Title: Aurangabad Killedharur Thieves Beat Soybean Trader
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..