औरंगाबाद - महावितरण कार्यालयात ध्वजवंदन करताना सह व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया.
औरंगाबाद - महावितरण कार्यालयात ध्वजवंदन करताना सह व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात

औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले. 

आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको
प्रशालेत ध्वजवंदन करून स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले. या वेळी मुख्याध्याक नंदकुमार साळुंके, डॉ. शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. दीपाली गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिता शिंदे यांनी आभार मानले. 

अल-मदानी उर्दू हायस्कूल, हर्सूल
प्रशालेत मिर्जा गालिब अ. रज्जक यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी अय्युब पटेल, खान इफ्तेखारखान, सय्यद मोबिन, शौकत शेख, मोईजोद्दिन शेख आजरा, शेख नाजिया, पठाण परवीन, खान शाईस्ता, शेख फिरदोस, शेख यास्मिन, खान उजमा आदींचीची उपस्थिती होती.

गणपतराव जगताप विद्यामंदिर, मुकुंदवाडी
प्रशालेत आबासाहेब जगताप यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी राकेश गांगुर्डे, कैलास वनारसे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा सजीव देखावा सादर केला. किशोर लंबे, धनश्री पाटील यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे महत्त्व विशद केले. प्रीती वैष्णव यांनी सूत्रसंचालन केले. बळिराम मरनांगे यांनी आभार मानले. यासाठी सरला देशमुख, अंजू शर्मा, दत्तात्रय बिराजदार, विजय खोमणे, स्नेहा पवार, भानुदास मलवाड, वैशाली अबिलवादे, अमोल मंदाडे, अश्‍विनी मद्रे, तुकाराम भवर यांनी पुढाकार घेतला.

ज्ञानकिरण प्राथमिक शाळा, ठाकरेनगर
किरण पाटील यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी राजेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणे व गीते सादर केली. ए. एस. दुलंगे यांनी सूत्रसंचालन केले. पी. एस. बारसे यांनी आभार मानले. 

वंडर गार्टन स्कूल, गारखेडा
प्रशालेत ध्वजवंदनानंतर सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी अध्यक्ष आकाश पालवे, मनीष ओझा, पी. डी. सावजी, पी. एस. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमती माने यांनी मुक्तिसंग्रामदिनाचे महत्त्व विशद केले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांनी बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन एस. एस. म्हस्के यांनी केले. संजय ताकपीर यांनी आभार मानले.

गोदावरी पब्लिक स्कूल, विवेकानंदनगर
नारायण शर्मा यांनी आपल्या वडिलांच्या स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींना उजाळा दिला. व्यंकटेश लांब यांनीही संग्रामातील लढ्यावर प्रकाश टाकला. या वेळी आमदार विक्रम काळे, शुभांगी सूर्यवंशी, दिलीप सुर्यवंशी, वैशाली सोनवणे, मंगला पेचफुले, शिवाजी लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेत पाहुण्यांच्या हस्ते भित्तिपत्रक व उद्योजक प्रदर्शनाचे उद्‌घाटन झाले.

ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालय, भावसिंगपुरा
मंदाकिनी विनायक काळे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर भाषणे केली. एस. व्ही. सोले यांनी सूत्रसंचालन केले. के. वाय खरात यांनी आभार मानले. यासाठी अंकुश लोखंडे यांनी पुढाकार घेतला.

ज्योती विद्यामंदिर, हर्सूल नाका
रामानंद तीर्थ, सरदार वल्लभभाई पटेल, गोविंदभाई श्रॉफ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी सुधीर कुलकर्णी, सुनंदा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रसंगी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचा सजीव देखावा सादर केला. स्वाती बागूल यांनी मुक्तिसंग्रामाबद्दल माहिती सांगितली. ईश्‍वरी मालवी यांनी सूत्रसंचालन केले.

दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय, मयूर पार्क
प्रशालेत शिवाजी चव्हाण, बी. डी. मनगटे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. मीरा जाधव यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन आशा आगलावे, तर सचिन धोत्रे यांनी आभार मानले. 

सीताई प्राईड इंटरनॅशनल स्कूल, झाल्टा चौक
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. या वेळी अशोक मुखेकर व वंदना मुखेकर, रश्‍मी दाणी, सीमा गायके, गणेश हाकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन दीपाली जैन, तर आभार भगवान आहेवाड यांनी मानले.

गुरुबक्षसिंग साबरवाल विद्यालय
नायगाव येथील स्व. गुरुबक्षसिंग साबरवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तिदिन साजरा करण्यात आला. अशोक बन्सवाल यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी मुख्याध्यापिका कल्पना पवार, संतोष जादव, शफीकखान पठाण, सुलक्षणा सूर्यवंशी, दिलीप पवार, सुरेश बन्सिले, जावेद शेख उपस्थित होते.

न्यू लिटल स्टार स्कूल
चिकलठाणा येथील म्हाडा कॉलनीमधील न्यू लिटल स्टार इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे संस्थेचे वसंत शेळके यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्वाती शेळके होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा भोसले उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिता म्हस्के यांनी, तर आभार प्रदर्शन योगिनी अहिरराव यांनी केले. यासाठी रंजना पाटील, अर्चना पवळ, रुपाली पठाडे, साधना तायडे यांनी परिश्रम घेतले. 

जयभवानी विद्या मंदिर
जय विश्‍वभारती कॉलनी येथील जय भवानी विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे सचिव रंगनाथ जाधव यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून वैजिनाथ गमे, मुख्याध्यापक दत्तात्रय पवार, उपमुख्याध्यापिका शोभा कासलीवाल, रजनी भालेराव, कल्पना चव्हाण, संजय सोनवणे उपस्थित होते. शिक्षिका सुनंदा शिंदे, श्रीकृष्ण सरकटे यांनी या वेळी मार्गदर्शन केले. लक्ष्मण गुरखे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण कांबळे यांनी आभार मानले. 

संस्कार प्राथमिक विद्यालय
जाधववाडी येथील संस्कार प्राथमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष जगदीश देसले यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी लीना देसले, सुभाष तायडे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्धावे गुरुजी स्मृतिदिनानिमित्त झालेल्या भेटकार्ड स्पर्धेतील विजेत्या ओजस्विनी देशमुख, शैलेजा सरोदे, चेतना चौधरी, मनीषा कार्ले यांचा गौरव करण्यात आला. सतीश तायडे, सुषमा जोशी, जावेद पठाण, सुनंदा बागूल, तुषार थोरात, सुदर्शन देवरे, जीवन गिरी, ज्ञानेश पवार, ओम पुरी, रामहरी डमाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन चेतना चौधरी यांनी केले. 

न्यू हायस्कूल, हर्सूल
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या हर्सूल येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे उपाध्यक्ष शेख अहेमद शेख चाँद यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी संस्थेचे सदस्य शेख शमीम शेख अहेमद, नगरसेवक बन्सी जाधव, पूनम बमणे, शिवाजी सांगळे, नरेंद्र औताडे, प्राचार्य एल. डी. सोनवणे, उपमुख्याध्यापक बी. डी. मगर, पर्यवेक्षक एस. एन. बंड, श्रीमती डॉ. मराठे, शैला धस उपस्थित होते.

महात्मा फुले हायस्कूल, पदमपुरा
मुख्याध्यापिका शोभा भाग्यवंत यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. मुख्याध्यापक प्रकाश बागड यांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मालती वाल्हे यांनी मुक्तिसंग्रामाची माहिती दिली. या वेळी अफसर शेख, वसंत शिंदे, पर्यवेक्षिका एस. पी. देशपांडे, रेखा शिंदे, आर. बी. साळुंके, वाय. के. खराद, दिलीप वाढे, सुनील लंगडे, विष्णू निंबाळकर, एम. टी. गायकवाड, पी. एस. सोनवणे, एस. ए. लिपने, किरण सपाटे, वैशाली थोरात, प्रतिभा धस आदी उपस्थित होते. 

मॉरल किडस हायस्कूल
सातारा परिसरातील मॉरल किडस हायस्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष संतोष जैस्वाल यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत भाषेतून संविधानाचे वाचन केले. या वेळी मुख्याध्यापिका श्रीमती अधाने, श्रीमती देशपांडे, श्रीमती हत्तेकर, श्रीमती शर्मा उपस्थित होत्या. 

राष्ट्रीय विद्यालय
गारखेडा परिसरातील राष्ट्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक जे. आर. अंभोरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त लष्करी अधिकारी रतन गिरी, धनराज पवार, प्राथमिकचे मुख्याध्यापक साईनाथ अहिरराव उपस्थित होते. सूत्रसंचालन व्ही. के. मोरे यांनी, तर आभार प्रदर्शन नवनाथ चव्हाण यांनी केले. संयोजक शोभा गायकवाड व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

नालंदा महाविद्यालय
नालंदा मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मधुकर ताजने यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. प्राचार्या डॉ. प्राप्ती देशमुख यांच्या हस्ते भित्तिपत्रक प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी प्रा. राहुल म्हस्के, कोमल बिरारे, दीपाली जाधव, वृषाली पुरंदरे, सविता बनकर, अनिल साळवे, अनंत कांबळे, विशाल दाभाडे यांची उपस्थिती होती. अंकिता अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले. नम्रता पांडे यांनी आभार मानले.

जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलालनगर
समाजप्रबोधन संचलित जागृती प्राथमिक शाळा, बन्सीलालनगर येथे हुताम्यांना अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शशिकला वाघ, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अलका खोडे होत्या. संगीता लटपटे, छाया पोरवाल, लता पिंपळे, जयश्री किर्लोस्कर, श्रद्धा देवतवाल यांची उपस्थिती होती. नेहा किर्लोस्कर यांनी सूत्रसंचालन केले. मोहिनी रोजेकर यांनी आभार मानले.

राजीव गांधी महाविद्यालय, करमाड
महाविद्यालयात इंदुमतीताई डोणगावकर यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी नागोराव सरोवर, अश्‍विनीकुमार चिंचोलीकर, प्रा. अर्जुन चव्हाण, प्रा. जयश्री पाटील, प्रा. धवसे, प्रा. रामदास घोडके, प्रा. डॉ. सुखदेव पोटदुखे, प्रा. विनोद जरारे, प्रा. गणेश कुऱ्हाडे, प्रभावती मुंढे, ज्ञानेश्‍वर जाधव, मधुकर राठोड, रमेश जाधव, शरद पवार, शोभा कुलकर्णी, श्री. राऊत यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. डॉ. रामदास केंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.

महावितरण कार्यालय
महावितरणच्या प्रादेशिक कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, प्रभारी महाव्यवस्थापक रेखा भाले, प्रभारी महाव्यवस्थापक विवले लक्ष्मीकांत राजेल्ली, अधीक्षक अभियंता रतन सोनुले, उदयपाल गानार, दिनेश अग्रवाल, सहायक महाव्यस्थापक शिल्पा काबरा यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

मध्यवर्ती बसस्थानक 
खासदार चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी नंदकुमार घोडेले यांच्यासह वरिष्ठ आगारप्रमुख स्वप्नील धनाड, स्थानकप्रमुख कृष्णा मुंजाळ, विजयकुमार पारखे, ललित शहा, दिनेश पडुळ, मंजूषा माने, शिवाजी बोर्डे, पंढरीनाथ काळे, दीपक बागलाने, श्री. सुरडकर, वाबळे, सौ. पळशीकर, घनशाम म्हस्के पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

मध्यवर्ती कार्यशाळा 
एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर कार्यशाळेचे व्यवस्थापक उद्घव काटे यांच्या हस्ते स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे उद्‌घाटन झाले. माजी नगरसेवक बालाजी मुंढे, अधीक्षक अ. शां. खैरमोडे, र. म. थलकर, ल. उ. परदेशी, गो. द. कबाडे यांची उपस्थिती होती.

धर्मवीर संभाजी विद्यालय
श्‍यामसुंदर नाईक, संचालक श्रीराम देशपांडे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. या वेळी प्रा. शुभांगी करोडकर म्हणाल्या, की भारताला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडा गुलामगिरीत होता. या गुलामीतून मुक्त होण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळविले आहे. या प्रसंगी शाळेच्या गुणवंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, कवायती सादर केले. अशोक मोरे, नारायण बाभूळगावकर, शिवदास गिरे आदींची उपस्थिती होती.

अनंत भालेराव विद्यामंदिर 
प्रमुख पाहुणे म्हणून सुमित अरोरा यांची उपस्थिती होती. या वेळी शशिकला बोराडे, श्रुती कुलकर्णी, सरिता भालेराव, सविता पानट, बकुल देशपांडे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. उज्ज्वला गुंजेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुधा कुलकर्णी यांनी आभार मानले.

जिल्हा परिषद शाळा, लिंगदरी
अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एन. राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच काशिनाथ ढाकणे, शालेय अध्यक्ष भगवान ढाकणे उपस्थित होते. या वेळी ग्रामपंचायतीमार्फत शाळा डिजिटल करण्यासाठी एल.ई.डी. टीव्ही आणि अभ्यासक्रम सेट भेट देण्यात आला. डिजिटल क्‍लास रूमचे उद्‌टन सरपंच ढाकणे यांच्या हस्ते झाले. संदीप ढाकणे यांनी सूत्रसंचालन केले. एल. एन. परसुरे यांनी आभार मानले.

रेणुका हायस्कूल, सातारा
मुख्याध्यापिका एम. एन. वाघुले यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. सहशिक्षक बी. ए. शिंदे यांनी मुक्तिसंग्राम दिनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या जीवनकार्याचा इतिहास मांडला. या वेळी सहशिक्षिका व्ही. जी. पाटील, एस. ए. गव्हाणे, एस. आर. तायडे, सी. एन. शेरकर, बी. ए. शिंदे, व्ही. एच. रोडगे, सचिन नागलबोने, एम. व्ही. हराळे, आर. बी. महाजन यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

देवगिरी महाविद्यालयात अजित पवार यांची उपस्थिती
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षणप्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयात ६९ व्या मराठवाडा मुक्‍तिसंग्राम दिनानिमित्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. १७) ध्वजवंदन झाले.

महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी साडेसात वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला. मराठवाडा शिक्षणप्रसारक मंडळाचे सरचिटणीस आमदार अतुल सावे, पंडितराव हर्षे, डॉ. अविनाश येळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ध्वजवंदनानंतर एनसीसीची कॅडेट परेड सादर झाली. त्यानंतर विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना श्री. पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरित करण्यात आले. कार्यक्रमात प्रा. तुकाराम वांढरे व सहकाऱ्यांनी यांनी मराठवाडा गीत सादर केले. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेस सेवादलातर्फे हुतात्मा स्मारकास मानवंदना
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलातर्फे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांनी बोरगाव गणपती (ता. फुलंब्री) येथील हुतात्मा स्मारकास मानवंदना देऊन मुक्तिलढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. या वेळी काँग्रेस सेवादलाचे ठोंबरे, कैलास उकिर्डे, गोविंद गायकवाड, संजय तायडे, अणुराग शिंदे, सुभाष भालेराव, किसन राठोड, रघुनाथ म्हस्के, शकिल पटेल, अतीश पितळे, रज्जू सेठ, कैलास तायडे, अजिनाथ पायगव्हाण, रावसाहेब मुळे, रमेश बलांडे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com