शहरातील चार पेट्रोलपंपांची अचानक तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

ग्राहक फसवणुकीला आळा घालण्यासाठी मोहीम

औरंगाबाद - देशात काही ठिकाणी पेट्रोलपंपावर इंधन वितरण प्रक्रियेत पंपचालकाकडून ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. लखनौ, ठाणे व इतर ठिकाणी असे गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे औरंगाबादेतील चार पेट्रोलपंपांची रविवारी (ता. १८) अचानक तपासणी करण्यात आली. पेट्रोल कंपनीचे अधिकारी, शासकीय अधिकारी, संबंधित तंत्रज्ञ यांच्यामार्फत पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने ही तपासणी केली. मात्र, यात कुठलाच गैरप्रकार आढळून आला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पेट्रोलपंपांच्‍या तपासणीसाठी वैध वजनमापे प्रशासन कार्यालयाचे निरीक्षक अशोक शिंदे, शिवहरी मुंडे, भारत पेट्रोलियमचे विकास रंजन पांडे, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे अपेक्षा भदोरिया, हिंदुस्तान पेट्रोलियमचे विपुल शर्मा, सेल्स ऑफिसर तसेच विविध कंपनीचे टेक्‍निशियन्स फुलचंद जाधव, प्रदीप लुटे, विजय गोरे, जगदीश खाडे यांच्यासह गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त रामेश्‍वर थोरात, निरीक्षक मधुकर सावंत, अजबसिंग जारवाल, अनिल वाघ, विजय जाधव, संजय बहुरे, नसीम खान, मनोज चव्हाण आदींनी सहभाग घेतला. पंपावर इंधन वितरणासाठी टोकीयम, गिल्बर्गो, ट्रेझरवाईन, मिट्‌को या कंपनीचे मशिन बसविण्यात आले आहेत. इंधन डिस्पेंसर मशिनच्या नोजलमध्ये व पल्सरमध्ये काही फेरफार करून ग्राहकांची फसवणूक केली जाते. हा प्रकार औरंगाबाद शहरात तर होत नाही ना, याची पाहणी करण्यासाठी संबंधित कंपन्यांचे अधिकारी व तंत्रज्ञांसोबत घेऊन तपासणी करण्यात आली. वैध वजन-मापक निरीक्षक यांनी शासकीय मापाप्रमाणे मशिनमधून वितरित होणारे इंधनाचे प्रमाण बरोबर आहे काय, याची खात्री केली. तंत्रज्ञांनी मशिनच्या नोजलमध्ये किंवा पल्सरमध्ये काही फेरफार करण्यात आले आहेत काय, याबाबत तपासणी केली. या तपासणीत चारही पेट्रोलपंपांवर कोणताही गैरप्रकार दिसून आला नाही.

या पेट्रोलपंपांवर केली तपासणी
युनिक ऑटो सर्व्हिसेस - उस्मानपुरा, हिंद सुपर सर्व्हिसेस - क्रांती चौक, राज ऑटो सर्व्हिसेस - जालना रोड, रिलायन्स पेट्रोलपंप - पुष्पनगरी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad marathwada news petrol pump cheaking