esakal | Aurangabad: थेरगाव येथे शंभर फूट अंतरावर दोनदा वीज कोसळली
sakal

बोलून बातमी शोधा

नैसर्गीक वीज

पाचोड : थेरगाव येथे शंभर फूट अंतरावर दोनदा वीज कोसळली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पाचोड : शंभर फुटाच्या अंतरावर दोन मिनिटाच्या फरकाने भर वस्तीत लिंबाच्या झाडावर कडकडाटात दोन वीज पडल्याने लिंबाच्या झाडाचे नुकसान झाल्याची घटना थेरगाव (ता. पैठण) येथील भुसारे वस्तीवर शुक्रवारी (ता.एक) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.

थेरगाव येथील जवळपास ३० भुसारे कुंटुबिय गावापासून दीड किलोमीटर अंतरावर शेतात वस्ती करून राहतात. शुक्रवारी (ता.एक) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास येथे जोरदार पावसाला सुरवात झाली. अन् भुसारे वस्तीवर कडकडाट आवाज करीत लक्ष्मणराव भुसारे यांच्या अंगणातील लिंबाच्या झाडावर वीज कोसळली.

त्याच्या आवाजाने वस्तीवरील सर्वजण भेदरले, काही कळण्या अगोदर पुन्हा शंभर फूट अंतरावरील लिंबाच्या झाडावर दुसरी वीज कोसळली. सर्व जण झोपेतून जागे झाले, पाहताच घरातील वीज गायब असताना ही सर्वांचे पंखे, मोबाईलचे चार्जर, टी.व्ही, खांबावरून घरात घेतलेले विद्युत वायर जळाले. यामुळे जीवितहानी झाली नसली दोन्ही लिंबाचे खोड पूर्णतः मध्यभागातून तुटून होरपळले गेले शंभर फुटाच्या अंतरात भर वस्तीत दोन विजा पडल्या. ही घटना दिवसा घडली असती तर अनर्थ घडला असता असे, लक्ष्मण भुसारे यांनी सांगितले.

loading image
go to top