औरंगाबाद : कुठे मध्यम, कुठे रिमझिम तर कुठे दमदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain

औरंगाबाद : कुठे मध्यम, कुठे रिमझिम तर कुठे दमदार

औरंगाबाद - मराठवाड्यात पावसाने खंड दिला. त्यामुळे अनेक भागांत पेरणी रखडली. ज्या ठिकाणी पेरणी झाली त्या ठिकाणी पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. दरम्यान, मंगळवारी आठही जिल्ह्यांत पाऊस सक्रिय झाल्याचे चित्र होते. कुठे मध्यम, कुठे रिमझिम तर कुठे दमदार पावसाने हजेरी लावली. पण, खरिपासाठी शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

औरंगाबाद, कन्नड, पैठण या तालुक्यांतील काही गावांमध्ये जोरदार तर काही गावांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. शेंद्रा कमंगर परिसरात सायंकाळी साडेचारच्या सुमारास १० मिनिटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. जालना शहरासह जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण होते. शहरात सायंकाळी पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. अंबड शहरासह तालुक्यातील रोहिलागड, वडीगोद्री परिसरात रिमझिम तर गोंदी परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे रिमझिम पाऊस झाला.

परतूर शहरासह परिसरात पावसाची संततधार होती. लातूर जिल्ह्यातही काही भागात पाऊस झाला. उदगीर आणि निलंगा शहर आणि परिसरात रिमझिम पाऊस झाला. जळकोट शहरात दुपारी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात इतरही तालुक्यात कुठे मध्यम तर कुठे रिमझिम पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपात सुरूच होता.

औंढा शहरात झालेल्या जोरदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आला. परभणी जिल्ह्यात मंगळवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत सरासरी १०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातही उमरगा, तुळजापूर, वाशी या तालुक्यात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या गेल्या २४ तासांत सरासरी १६.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Aurangabad Marathwada Weather Update Monsoon Rainfall Farmer Kharif Crops

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..