पावसाळ्यात विजेच्या अपघातापासून सुरक्षा करा

आपत्कालीन परिस्थितीसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज
Aurangabad MSEB Protect from lightning strikes in rainy season
Aurangabad MSEB Protect from lightning strikes in rainy seasonsakal
Updated on

औरंगाबाद : पावसाळ्यात अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात विजेच्या समस्यांसाठी नागरिकांना सहज संपर्क साधता यावा यासाठी नियंत्रण कक्ष व आपत्कालीन कक्षही सज्ज झाला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळीवारा यामुळे झाडांच्या मोठ्या फांद्या तुटून वीज तारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीज खांब वाकतात. त्यामुळे तारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या तारांपासून सावध राहावे.

त्यांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. तसेच अतिवृष्टी किंवा वादळाने तुटलेल्या वीजतारा, खांब, रस्त्यांच्या बाजूंचे फिडर पिलर, ट्रान्स्फॉर्मर्सचे लोखंडी कुंपण, फयुजबॉक्स तसेच घरातील ओलसर उपकरणे, शेतीपंपांचा स्वीचबोर्ड याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळणे सहज शक्य असते. नागरिकांनी महावितरणच्या टोल फ्री क्रंमाक व नियत्रंण कक्ष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरण औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले.

अशी घ्या खबरदारी

  • पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

  • घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक आर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.

  • घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्विच तत्काळ बंद करावा.

  • पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांनी विजेपासून सुरक्षितेसाठीच्या उपाययोजना कराव्यात.

  • विजेच्या खांबांना किंवा स्टेला जनावरे बांधू नयेत तसेच त्यास दुचाकी टेकवून ठेवू नये. किंवा खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.

  • घरावरील डिश किंवा अॅन्टिना वीजतारांपासून दूर ठेवावेत.

  • ओल्या कपड्यावर विजेची इस्त्री फिरवू नये.

  • विजेचे स्विचबोर्ड किंवा विद्युत उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.

नियंत्रण कक्षाशी साधा संपर्क

शहर व ग्रामीण भागातील वीज ग्राहकांसाठी २४ तास सुरू असलेल्या महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्रांतील कॉल सेंटर्सचे क्र. १८००२३३३४३५, १८००१०२३४३५, १९१२, १९१२० हे टोल फ्री क्रंमाक उपलब्ध आहेत. तसेच औरंगाबाद ग्रामीणमधील वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत महावितरण औरंगाबाद येथील नियंत्रण कक्ष मो.क्र. ७८७५७५६६५२ तसेच औरंगाबाद शहरातील ग्राहकांसाठी ७०६६०४२४१२ कोणत्याही कंपनीच्या लॅंडलाइन किंवा मोबाइलद्वारे या टोल फ्री क्रंमाकांवर वीज ग्राहकांना तक्रार दाखल करता येणार आहे.

मराठवाड्यातील नियंत्रण कक्ष

  • औरंगाबाद शहर मंडल ७०६६०४२४१२

  • औरंगाबाद ग्रामीण मंडल ७८७५७५६६५२

  • जालना मंडल ७८७५७६४१४४

  • बीड मंडल ७८७५१७६४६४

  • उस्मानाबाद मंडल ७८७५२११६१५

  • लातूर मंडल ७८७५७६२०२१

  • नांदेड मंडल ७८७५४७३९८०

  • हिंगोली मंडल ७८७५४४७१४३

  • परभणी मंडल ७८७५४७६३२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com