esakal | Aurangabad : शहरातील ४३ केंद्रांवर ‘नीट’ची परीक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

neet

Aurangabad : शहरातील ४३ केंद्रांवर ‘नीट’ची परीक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : वैद्यकीय प्रवेशासाठी अनिवार्य असलेली राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल इलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (नीट) ची परीक्षा रविवारी (ता. ११) होत आहे. या परीक्षेसाठी देशभरातून १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी बसले असून औरंगाबादेत ४३ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

रविवारी होणाऱ्या परिक्षेसाठी शहरात सुमारे १५ हजार ४८० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. परीक्षेला येतांनाची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना दागदागिणे, ज्वेलरी घालून येवू नये. मोबाईल अथवा मेटलची कोणतीही वस्तू परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. दिलेल्या वेळेच्या किमान अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहाणे अनिवार्य आहे.

परीक्षेला येताना तोंडाला मास्क, हॅण्डग्लोव्हज् घालून येणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी फूल शर्ट आणि मुलींनी अंगभर डिझायनर कपडे, मोठे बटण असलेले कपडे घालून परीक्षेला येवू नये. तसेच मोठ्या हील्सचे सॅंडल, शूज तसेच मोठे खिसे असणाऱ्या पॅन्ट घालून येवू नये. परीक्षेला येताना हाफ शर्ट, टी-शर्ट घालून येण्यास परवानगी दिली. परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी शूज, चप्पल किंवा सॅण्डल्स वर्गाच्या बाहेर काढून ठेवावे लागणार आहे. सोबत सॅनिटायझर घेवून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. पेपरची वेळ सकाळी अकरा असली तरी विद्यार्थ्यांना सकाळी साडेसातपासून परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

loading image
go to top