आता मुख्य रस्त्यावरच हेल्मेट सक्ती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

औरंगाबाद - गल्लीबोळांत, अंतर्गत रस्त्यांवर वाहनधारकांना हेल्मेट आवश्‍यकच आहे असे नाही; मात्र मुख्य रस्त्यांवर हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देणार असल्याचे प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मंगळवारी (ता. 27) सांगितले. 

औरंगाबाद शहरात एक फेब्रुवारी 2015 पासून हेल्मेटसक्तीची चोख अंमलबजावणी तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कार्यकाळात सुरू झाली. यानंतर नागरिकांत मोठा रोष निर्माण झाला होता. प्रंचड विरोधानंतरही पोलिसांनी ठोस कारवाया केल्या. त्यामुळे हेल्मेट परिधान करणे शहरवासीयांच्या अंगवळणी पडले आहे; परंतु बहुतांशवेळा वाहतूक पोलिस केवळ हेल्मेटबाबतच कारवाया करतात. त्यातून नागरिक व पोलिस यांच्यात वाद होतात. विशेष मोहीम राबवून पोलिस गल्लीबोळांतही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई करतात. ही बाबही प्रभारी पोलिस आयुक्‍त भारंबे यांनी हेरली. यावर त्यांनी ठोस भूमिका घेत गल्लीबोळांत हेल्मेटसक्‍तीची गरज नसावी. तेथे कारवाई न करता वाहतूक नियमनाकडे अधिक लक्ष द्यावे. महामार्गावर, मुख्य रस्त्यांवर हेल्मेट नसेल तर अवश्‍य कारवाई करावी, अशी भूमिका मांडली आहे. याबाबत ते पोलिस अधिकाऱ्यांनाही सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: aurangabad news helmet issue police