नागेश्वरवाडीत कुरिअरच्या कार्यालयावर आणखी एक छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

औरंगाबाद - फ्लिपकार्टवरून ऑनलाइन शस्त्रे मागविणाऱ्यांवर छापे घालून गुन्हे शाखेने मोठा शस्त्रसाठा सोमवारी रात्री जप्त केला. त्यानंतर बुधवारी नागेश्वरवाडीस्थित कुरिअर कार्यालयात छापा घालून आणखी सात शस्त्रे पोलिसांनी जप्त केली. यात काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सायंकाळपर्यंत कारवाई सुरू होती. 

नागेश्वरवाडीत एकार्ट या कुरिअर कंपनीच्या कार्यालयात पोलिसांनी दुपारी छापा घातला. यात फ्लिपकार्टवरून मागविण्यात आलेल्या सहा तलवारी, एक चाकू पोलिसांनी जप्त केला. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी करूनच पुढील कार्यवाही होईल, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी 24 जणांनी फ्लिपकार्टवरून तलवार व अन्य शस्त्रे मागविल्याचे पोलिस तपासातून उघड झाले होते. यात सोमवारी रात्री जयभवानीनगर व नागेश्‍वरवाडीत कुरिअर कार्यालयात छापे घालून 28 शस्त्रे जप्त करण्यात आली होती. यात कुरिअर व्यवस्थापकासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. उर्वरित सतरा संशयितांचे लोकेशन पोलिसांनी घेतले. त्यानंतर पुन्हा बुधवारी पोलिसांनी कारवाई केली. 

जुना डेटा तपासणार 
खेळणीमार्फत शस्त्र मागविल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आता दंगलीपूर्वी, तसेच काही महिन्यांपूर्वी खरेदी झालेली शस्त्रे, तसेच ग्राहकांचा जुना ऑनलाइन डेटा पोलिस तपासणार आहेत. सोबतच इतर कुरिअर एजन्सी व फ्लिपकार्टसारख्या इतर ऑनलाइन कंपन्यांवरही लक्ष असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

Web Title: aurangabad news raid on the courier's office in Nageshwarwadi

टॅग्स