esakal | औरंगाबादेत सेंद्रीय शेती आणि देशी गोसंवर्धनातून शेतकऱ्याची प्रगती
sakal

बोलून बातमी शोधा

farming

औरंगाबादेत सेंद्रीय शेती आणि देशी गोसंवर्धनातून शेतकऱ्याची प्रगती

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : शेतीला व्यवसायाची जोड देऊन अनेक शेतकरी प्रगती करत आहे. अशीच प्रगती पळशी शहर (ता.औरंगाबाद) येथील अल्पभुधारक शेतकरी अप्पासाहेब गंगाधर शेळके यांनी केली. सेंद्रीय शेतीसोबत त्यांनी नियोजनबद्धरित्या देशी गीर गायीवर आधारित दुग्धव्यवसाय आकारास आणला आहे. इंटरनेट व सोशल मिडीयाचा कार्यक्षम वापर करुन त्यांनी ग्राहक मिळविले. सध्या ते देशी गायीचे दुध डोअर टु डोअर विक्री करत असून त्यांना शंभर रुपये प्रती लिटर असा दर मिळतोय. या सोबत शेण खतातून ही त्यांना उत्पन्न मिळते. याच शेणखताचा ते स्वतःच्या जमीनीत सेंद्रीय शेतीसाठी सुद्धा वापर करत आहे.

अप्पासाहेब शेळके यांनी पळशी शहर शिवारात दोन एकर जमीन आहे. याच जमीनीवरील चार गुंठ्यात त्यांनी सन २०१७ मध्ये फक्त देशी गीर गायीच्या दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. सुरुवातील त्यांनी दोन गीर गायी येवला जि. नाशिक येथून आणल्या तर उर्वरित गायी या धुळे जिल्ह्यातून आणल्या आहे. त्यांच्या जय बाबाजी गोवसंवर्धन मुक्त गोठ्या मध्ये सध्या २४ गिर गायी आहे. यामध्ये सध्या चार गायी दुभत्या तर चार गायी गाभण आहे. या चार गायीपासून त्यांना २६ लिटर दुध मिळते. हे दुध ते डोअर टु डोअर विक्री करण्यावर भर देतात. त्यांच्याकडील दुधाला खुप जास्त मागणी असल्याने ग्राहक या चांगल्या प्रतीच्या दुधाला शंभर रुपये प्रती लिटर दर द्यायला तयार झालेला आहे.

हेही वाचा: जनतेकडून पैसा काढून खास लोकांना दिला जातोय - राहुल गांधी

अप्पासाहेब शेळके यांनी गीर गायींचे संगोपण, देखभाल व दुधाचा दर्जा चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सुरवातील काही दिवस त्यांनी डेअरीला दुध परविले आता त्यांना वकील, डॉक्टर आणि महागडे दुध विकत घेऊ शकणारे औरंगाबाद शहरातील ग्राहक मिळाले आहे. यासाठी त्यांनी सोशल मिडीया, इंटरनेटची मदत घेतली. अप्पासाहेब यांना सर्व खर्च वगळता दरवर्षी पन्नास टक्के नफा असतो. गायींच्या वर्षीभर संगोपनासाठी दरवर्षी ते चारा कमी पडू नये यासाठी मका, कडबा विकत घेतात.

हेही वाचा: स्वातंत्र्य कुणासाठी आणि कशाचे?

अप्पासाहेब शंभर टक्के सेंद्रीय शेती करतात.

त्यांच्याकडील भाजीपाला हा सेंद्रीय पद्धतीने पिकविलेला असतो. तसेच त्यांच्याकडे एका एकरात सिताफळाची बाग असून ती सुद्धा सेंद्रीय पद्धतीने केली जाते.

  • सध्या केवळ दुग्धव्यवसायावर सर्वाधिक भर

  • चाऱ्याची सोय होण्यासाठी मुरघासची निर्मिती

  • सध्या लहान मोठ्या २४ गीर गायी

  • पाण्यासाठी विहरीचा स्त्रोत

  • रोजचे दुध संकलन

  • दिवसाला सध्या २४ लिटर

  • कासेतील २५ टक्के दुध वासराला देण्याचे पथ्य

  • व्यवसायातील नफा सुमारे पन्नास टक्के

  • मुक्त संचार गोठ्याचा वापर

  • वर्षभरात १२ ट्रॅक्टर पेक्षा जास्त शेणखत

loading image
go to top