शिवसेनेविरुद्ध तक्रार म्हणजे मुर्खपणाचा कळस : शिवसेना नेते 

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - शिवसेनेने फसवणूक केली म्हणत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आमदार प्रदीप जैस्वाल व माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात देण्यात आलेली तक्रार म्हणजे मुर्खपणाचा कळस असून शहरातील वातावरण बिघडवणारी आहे. ज्याने कोणी ही तक्रार केली आहे, त्याच्याच अटकेची आम्ही पोलिसांकडे मागणी करु अशी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया व्यक्‍त केली.

 क्‍लिक करा : चक्क सेवानिवृत्त आयजीच्या कारवर अंबर दिवा 

महायुतीच्या नावाने मतदान मागून नंतर कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाउन सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रयत्न केले जात आहेत, यावरुन फसवणुकीची बेगमपुरा पोलिस ठाण्यात रत्नाकर भीमराव चौरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, चंद्रकांत खैरे व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात तक्रार दिली होती. तक्रारीत संबंधितांनी हिंदुत्वाच्या रक्षणासासाठी मते मागितली, महायुती करून लढले आणि आता मात्र कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत सत्ता स्थापन करत आहेत. त्यामुळे आमचे मत वाया गेले असून फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

हेही वाचा : चक्क पोलिसाला 78 हजाराचा गंडा 

ही तक्रार बेगमपुरा पोलीसांनी विशेष शाखेकडे वर्ग केली आहे. या सदंर्भात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यांशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मुळात तक्रारदाराचे डोके ठिकाणावर आहे का, हे आधी तपासले पाहिजे. शिवसेना-भाजप हे दोन स्वतंत्र पक्ष आहेत, आम्ही निवडणुकीत एकत्रित लढलो हे जरी खरे असले तरी भाजपने युती करतांना दिलेला शब्द पाळला असता तर आज ही वेळ आलीच नसती. शिवसेनेने प्रचारा दरम्यान अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा वारंवार उल्लेख केला होता. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मी पुन्हा येईन म्हणत मुख्यमंत्र्यांनी देखील मते मागितलीच होती, ही फसवणूक नाही का? असा सवाल देखील श्री. खैरे यांनी उपस्थित केला. तक्रार देणाऱ्या चौरे यांनाच अटक करा, ते शहरातील वातावरण बिघडवत आहेत अशी मागणी आम्हालाच पोलीसांकडे करावी लागेल असेही खैरे यांनी स्पष्ट केले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aurangabad shivsena leader chandrkant khaire