कॅन्सरच्या रुग्णांना मुंबई, पुण्यापेक्षा जास्त सुविधा कुठे? वाचा-

Cancer Hospital Aurangabad news
Cancer Hospital Aurangabad news

औरंगाबाद : राज्य कर्करोग संस्थेसाठी सुमारे 25 कोटींच्या लिनियर एक्‍सलरेटर या यंत्राची खरेदी प्रक्रिया टाटाच्या धर्तीवर अंतिम टप्प्यात आली आहे. यासंबंधी मुंबईत सोमवारी (ता. 11) हाफकिन महामंडळात झालेल्या बैठकीत निर्णय झाला असुन संबंधित कंपनीला पर्चेस ऑर्डर देण्यात आली आहे. हे यंत्र किरणोपचाराचे तिसरे यंत्र ठरेल.

तसेच हे यंत्र मिळाल्यावर ककरोग रुग्णांची वेटींग कमी होऊन क्‍लिष्ट पद्धतीचे किरणोपचार कर्करोग रुग्णालयात सुलभ होतील. सध्या कर्करोगाचे रुग्ण मुंबई पुण्यातील वेटींगमुळे उपचारासाठी येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात धाव घेत आहे. त्यादृष्टीने येथील सुविधाही दिवसेंदिवस वाढत आहेत. 

शासकीय कर्करोग रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर किरणोपचार विभागाचे विस्तारीकरणाचे बांधकाम एचएससीसी एजन्सीला देण्यात आले आहे. बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात असून, लवकरच कार्यादेश निघण्याची शक्‍यता आहे.

या किरणोपचार विस्तारीकरणात बांधकामात लिनॅकचे एक बंकर उभारले जाणार आहे. त्यात नव्याने लिनियर एक्‍सलेटर या यंत्राची खरेदी प्रक्रिया पुर्ण झाली असून सुमारे पंचवीस कोटींचे हे या रुग्णालयातील दुसरे, तर किरणोपचाराचे तिसरे यंत्र ठरणार आहे. 

शेजारच्या राज्यांतूनही रुग्ण 

सध्या अललेले लिनॅक व भाभाट्रॉन-2 वर किरणोपचार दिले जातात. मात्र, मराठवाड्यातील एकमेव कर्करोग रुग्णालय असल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देशशिवाय गुजरात, मध्यप्रदेश, बिहारमधूनही रुग्णांचा ओघ वाढला आहे. त्यातील बहुतांश रुग्णांना ठराविक काळाने किरणोपचार दिले जातात. मात्र या दोन्ही यंत्रावर वाढलेल्या रुग्णसंख्येचा ताण पडला आहे. 

वेटींग होणार कमी 

नव्याने मिळणाऱ्या लिनॅक यंत्राचे नियोजन राज्य कर्करोग संस्थेत करण्यात आले असुन या यंत्रामुळे सध्याची रुग्णांची वेटींग कमी होऊन क्‍लिष्ठ पद्धतीचे किरणोपचार व नियमित किरणोपचार असे स्वतंत्र विभाग करता येतील. त्यातून किरणोपचार घेणाऱ्या जास्त रुग्णांना उपचार देणे शक्‍य होणार असल्याचे किरणोपचार विभाग प्रमुख डॉ. बालाजी शेवाळकर म्हणाले. 

दोन कोटींची यंत्रे दाखल 

दरम्यान, गेल्या वर्षभरापुर्वी प्रशासकीय मान्यता मिळालेल्या 29 कोटींच्या यंत्रांपैकी 2 कोटींची 11 प्रकारची यंत्रसामग्री शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल झाली. यात डिजिटल रेडिओग्राफी, बायोसेफ्टी कॅबिनेट, सेंट्रल स्टेशन फॉर आयसीयू, ऍनास्थेशिया वर्क स्टेशन, लिक्विड वॉर्मर, ऍडव्हान्स्ड लॅप्रोस्कोपिक सेट, इलेक्‍ट्रिक सर्जिकल क्वाटरी युनिट, व्हेसल फिलिंग, लॅप्रोस्कोपी सेट, डिफिब्रीलेटर आदी 11 उपकरणे दाखल झाली असुन यातील बहुतांश यंत्र कार्यान्वीत झाल्याचेडॉ. अरविंद गायकवाड म्हणाले.

प्रकल्पाला मिळाली गती

राज्य कर्करोग संस्थेचे बांधकाम आचारसंहितेत अडकू नये तसेच लिनियर एक्‍सलेटर खरेदीसाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, डिएमईआर संचालक डॉ. तात्याराव लहाने, राज्य कर्करोग संस्थेचे सल्लागार डॉ. कैलाश शर्मा, हाफकिनचे व्यवस्थापक डॉ. देशमुख, अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या विषेश पाठपुराव्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे.

अशी होईल उभारणी 

विस्तारीकरणात तळमजल्यावर लिनॅक, ब्रेकीथेरपी बकरसह बाह्यरुग्ण विभाग, कर्मचाऱ्यांसाठी कक्ष, मायनर ओटी, त्यानंतर पहिल्या मजल्यावर 42 खाटांचा वॉर्ड, दुसऱ्या मजल्यावर दोन वॉर्ड होतील. सध्याच्या इमारतीवर एक मजल्याचे बांधकाम होईल. या मजल्यावर 8 आयसोलेशन कक्ष, 16 खाटांचे एमआयसीयू, 15 खाटांचे पेईंग रूम, डॉक्‍टरांसाठी कक्षाचे डिपीआरमध्ये प्रस्तावित आहे. 

लिनॅक यंत्राची हाफकिनने ऑडर काढली आहे आहे. आवश्‍यक प्रक्रिया पूर्ण करून कंपनीकडून यंत्र दिले जाईल. तो पर्यंत किरणोपचारच्या विस्तारीकरणाचे बांधकाम व बंकरचे कामही सुरु होईल. 
-डॉ. कैलाश शर्मा, सल्लागार, राज्य कर्करोग संस्था, औरंगाबाद 

असे बहरतेय कर्करोग रुग्णालय 

  • 20 सप्टेंबर 2012 ला शंभर खाटांच्या शासकीय कर्करोग रुग्णालयाची महुर्तमेढ 
  • 3 जुन 2015 ला टाटा इन्सिट्युट सोबत टायप 
  • पाच वर्षांत कामगीरी उंचावली 
  • 15 ऑक्‍टोबर 2016 ला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा 
  • केंद्राच्या एनपीसीडीसीएस योजनेतुन 96.70 कोटींचा प्रकल्प 
  • केंद्राचा 60 तर राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा 
  • 11 फेब्रुवारी 2018 ला झाले भूमिपूजन 
  • 31.07 कोटींच्या बांधकामाला मे 2018 मध्ये मान्यता 
  • 165 वाढीव खाटांचे विस्तारीकरण 
  • रेडिओथेरपी विभागाच्या दुसऱ्या युनिटचा विस्तार 
  • लिनॅक व ब्रेकीथेरपी बंकरचे बांधकाम. त्यावर दोन मजले. 
  • सध्याच्या रुग्णालय इमारतीवर एक मजला 
  • 14 ऑगस्टला 38.75. कोटींच्या बांधकामाच्या डिपीआरला मान्यता 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com