esakal | Aurangabad: शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण अनिवार्य
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण मोहीम

औरंगाबाद : शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण अनिवार्य

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या व खासगी शाळा सोमवार (ता.४) पासून सुरू होणार आहेत. आठवीपर्यंत असणाऱ्या ३९३ तर आठवी ते बारावीपर्यंत असणाऱ्या ४१३ अशा एकूण ८०६ शाळा सुरू होणार आहेत. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार या शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांतही आनंदाचे वातावरण असून ओसाड भासणाऱ्या शाळा पुन्हा बच्चे कंपनीमुळे गजबजणार आहेत.

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियमांच्या तरतुदीनुसार नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य सरकारने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता सोमवार (ता.४) पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: वाघोली : कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली

महापालिका हद्दीतील ८ वी ते १२ वी पर्यतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सुरू करण्याचे आदेश महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी काढले आहेत. त्यानुसार महापालिका उपायुक्त संतोष टेंगळे यांच्या उपस्थितीत शाळांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य यांची बैठक घेण्यात आली.

शहरातील खासगी माध्यमिक विभागाच्या तसेच पालिकेच्या अशा एकूण ४१३ शाळा शहरात सुरू होत आहे. यात पालिकेच्या १७ शाळांचा समावेश आहे. या ४१३ शाळांमध्ये ७८ हजार विद्यार्थी शिक्षण घेणार आहेत. तसेच ३ हजार ५०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिली आहे.

loading image
go to top