esakal | Wagholi: कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली
sakal

बोलून बातमी शोधा

कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली

वाघोली : कमी-उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाघोली : वाघोली आव्हाळवाडी रोड वरील उत्सव रेसिडेन्सी सोसायटीला होत असलेल्या कमी - उच्च दाबाच्या वीज पूरवठयामुळे अनेक घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाली. यामुळे सुमारे दीड लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले. या शिवाय सोसायटीची अनेक उपकरणे जळली. सोसायटी धारकांना महावितरणसह मुखमंत्र्यां पर्यंत सर्वांना ई-मेल द्वारे तक्रार केली. महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र ते दखलं घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्हाला आता सोसायटी मध्ये राहणे मुश्किल झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

सुमारे 176 सदनिका असलेली ही सोसायटी आहे. या सोसायटीला कधी कमी तर कधी अचानक उच्च दाबाने वीज पुरवठा होतो. तसेच अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे पाण्याची मोटार, लिफ्ट आदी उपकरणे जनरेटरवर चालवावी लागतात. त्यामुळे खर्चाचा भुर्दंड वाढतो. विजेच्या या प्रकारामुळे रहिवासी वैतागले आहे. काही दिवसापासून विजेचा पुरवठा अचानक उच्च दाबाने झाल्याने अनेकांचे टीव्ही, फ्रीज, फॅन, मिक्सर आदी उपकरणे जाळली.

हेही वाचा: इचलकरंजी : हनी ट्रॅपच्या विळख्याला वेळीच रोखा

त्रस्त सोसायटी धारकांनी महावितरण पासून आमदार, खासदार, मुख्यमंत्री यांच्या पर्यंत तक्रार केली. महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली. मात्र त्यांनी ही टोलवाटोलवी केल्याचे सोसायटी धारकांनी सांगितले. महावितरणचे कर्मचारी वीज बिल भरले नाही तर पुरवठा तोडण्याची धमकी देत असल्याचेही सोसायटी धारक म्हणाले. यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी सोसायटी धारक करीत आहे.

विजेच्या समस्यांमुळे रहिवाशी हैराण झाले आहेत. इथे राहणे मुश्किल झाले आहे. विजेची ही समस्यां सोडविण्यासाठी महावितरणने लवकर दाखल घ्यावी

- गोकुळ वधे, रहिवाशी, उत्सव रेसिडेन्सी.

सोसायटी ला विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल ला अनेक जोड आहेत. तसेच अन्य काही समस्या व पावसाळा असल्याने बिघाड होत असेल. त्यांच्या समस्यांची दखल घेतोच.

- गणेश श्रीखंडे, शाखा अभियंता, महावितरण, वाघोली.

महावितरण, सोसायटी धारक व बांधकाम व्यावसायिक यांची बैठक आयोजित करून सोसायटीच्या समस्या बाबत चर्चा झाल्यास नक्कीच तोडगा निघेल. ही बैठक दोन दिवसात आयोजित करण्याचा प्रयत्न करतो

- संदीप सातव, माजी ग्रामपंचायत सदस्य.

loading image
go to top