Aurangabad: दोन दिवसात शहरात ७ टन फुलांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दिवसात शहरात ७ टन फुलांची आवक

औरंगाबाद : दोन दिवसात शहरात ७ टन फुलांची आवक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : दसऱ्यानिमित्त शहरात दोन दिवसात बाजार समितीसह खुल्या बाजारात ७ टन झेंडुच्या फुलांची आवक झाली. यंदा अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणवार माल खराब निघाला होता. शुक्रवारी (ता.१५) सकाळी ६० रुपये किलोने विक्री झालेल्या झेंडुचे दर आवक वाढल्याने पडले. दुपारी अडीचनंतर २० ते ३५ रुपये किलोने फुलांची विक्री झाली. तर सायंकाळी अनेक व्यापाऱ्यांनी खराब झालेली फुले रस्त्यावर फेकून दिली. यंदा आवक जास्त होती. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना चांगला दर मिळाला.

झेंडुची चांगली फुले २५ ते ३० रुपये किलोने व्यापाऱ्यांनी खरेदी केली होती. तिच फुले व्यापाऱ्यांनी ८० ते १२० रुपये किलोने विक्री केली. शहर व परिसरात गुरुवारी (ता.१४) खुल्या बाजारात फुले १२० ते १०० रुपये किलोने विक्री झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी चांगला दर मिळाला.

हेही वाचा: Video : धोनीची चूक जड्डूनं भरुन काढली; मॅच इथंच फिरली!

दुपारी तीननंतर खरेदी कमी झाल्यामुळे व्यापाऱ्यांकडे पडून असलेला खराब माल शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकून दिला. शहरात सिडकोतील जळगाव रोड, बीड बायपास, टिव्ही सेंटर, सीटी चौकातील फुल मार्केट, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, जालना रोड, चिकलठाणा, वाळूजसह विविध ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली होती. गुरुवारी चांगला भाव मिळाला. यात चांगल्या दर्जाची फुले विक्री झाली. त्यानंतर पावसामुळे खराब झालेला मालही विक्रीसाठी आला होता. तो माल विक्री न झाल्याने तो व्यापाऱ्यांनी रस्त्यावर टाकून दिली.

महापालिकेत शस्त्रपूजन

महापालिका मुख्यालयातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या दालनात अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या हस्ते शस्त्र पूजन करण्यात आले. यावेळी वॉर्ड अधिकारी सुरडकर, जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, सुरक्षा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

loading image
go to top