esakal | खंडाळा येथे पाझर तलावमध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

drowning

जलसाठे तुडुंब भरलेले असल्याने त्याने आपल्या शेताजवळील पाझर तलावातील पाणी पाहून कपडे काठावर ठेवून तलावात पोहोण्यासाठी उडी मारली

खंडाळा येथे पाझर तलावमध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (औरंगाबाद): गायरान जमिनीतील तुडुंब भरलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या दहा वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना खंडाळा (ता.पैठण) येथे गुरुवारी (ता.दोन) दुपारी घडली. गणेश जगन्नाथ आगळे असे मृत मुलाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, खंडाळा येथील गणेश आगळे हा यावर्षी इयत्ता चौथीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तूर्तास शाळा बंद राहून केवळ ऑनलाईन वर्ग सुरू असल्यामुळे तो सकाळी दहाच्या सुमारास शेळी चरण्यासाठी शेतात घेऊन गेला होता.

जलसाठे तुडुंब भरलेले असल्याने त्याने आपल्या शेताजवळील पाझर तलावातील पाणी पाहून कपडे काठावर ठेवून तलावात पोहोण्यासाठी उडी मारली. मात्र त्यास पोहता येत नसल्याने पाण्यात उडी मारल्यानंतर त्याच्या नाका तोंडात पाणी जाऊन तो गटांगळ्या घेत पाण्यात बुडाला. या घटनेची कुणालाच खबर नव्हती. दुपारी त्याचे वडिल जगन्नाथ आगळे हे शेतात गेले असता त्यांना शेळी एका झाडाला बांधल्याचे दिसून आली. त्यावेळी त्यांनी गणेशचा परिसरात शोध घेत ते पाझर तलावावर गेले असता त्यांना गणेशचे कपडे दिसून आले. त्यांनी तातडीने या घटनेची गावातील नागरिकांना माहिती देऊन मदतीसाठी बोलावले.

हेही वाचा: पत्नीला मारायला निघाला होता, स्वतःचाच गळा घेतला कापून!

माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला पाण्याबाहेर काढून विहामांडवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्याने त्यास तपासून मृत घोषित केले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरिक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, सुरेश माळी करीत आहे.

loading image
go to top