कसा अभ्यास करायचा? ८ दिवस गाव अंधारात, परीक्षेआधी विद्यार्थ्यांसमोर प्रश्न | 10th Exam News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th 12th exam How study 8 days village darkness students before the exam

कसा अभ्यास करायचा? ८ दिवस गाव अंधारात, परीक्षेआधी विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

माणिकनगर : आठ दिवसांपासून ऐन दहावी-बारावीच्या परीक्षेच्या दरम्यान केऱ्हाळा येथील बसस्टँडवरील तिन्ही रोहित्र जळाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले असून यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासाची गैरसोय होत आहे. महावितरणच्या नियोजनशून्य कारभारामुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

केर्हाळा (ता.सिल्लोड) येथील गेल्या पाच ते सहा महिन्यापासून शेतातील २५ केव्ही थ्रीफेज वीजपुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर जळाले होते. शेतातील विजेचा भार वाढल्याने संबंधित स्थानिक वायरमन पांढरे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ६३ केव्ही थ्रीफेज ट्रान्सफॉर्मर मागणीचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला होता.

वरिष्ठांनी बांबर्डे ट्रांसफार्मरसाठी नवीन ६३ केव्ही थ्रीफेज ट्रान्सफॉर्मर मंजूर केले. परंतु मंजूर असलेले ट्रान्सफॉर्मर अद्यापपर्यंत बसवण्यात आले नसल्याने व वेळोवेळी पाठपुरावा करूनही वरिष्ट कार्यालय दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला आहे. ऐन दहावी-बारावीच्या परीक्षेच्या काळात बसस्थानक परिसरातील नागरिकांची, विद्यार्थ्यांची अभ्यासासाठी कसरत होत आहे.

''बसस्टँडवरील जळालेले सिंगल फेज तिन्ही गट्टू उपलब्ध झाले असून ते उद्या बसवणार आहे. बांबर्डे डीपीवरिल ६३ केव्ही ट्रांसफॉर्मरबद्दल माहिती नाही. माहिती घेऊन लवकरच सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करतो.''

-सचिन बनसोड, महावितरण,विभाग उपअभियंता

Web Title: 10th 12th Exam How Study 8 Days Village Darkness Students Before The Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..