
दहावी-बारावी परीक्षेसाठी शाळेच्या मागणीनुसार एसटी
औरंगाबाद : येत्या चार मार्चरोजी दहावीची परीक्षा सुरु होत आहे. त्यापाठोपाठ बारावीही परीक्षा होणार आहे. दोन वर्षानंतर ऑफलाईन होणाऱ्या या परिक्षेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. जिल्ह्यांतर्गत शाळेच्या मागणीनुसार एसटी बसचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी दिली.(10th and 12th exam Update)
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. या वर्षी कोरोनानंतर पहिल्यांदा ऑफलाईन परीक्षा होणार आहे. या परिक्षेसाठी एसटी विभागाने नियोजन करण्याचे आदेश एसटी महामंडळाकडून देण्यात आलेले आहेत. कोरोनापूर्वी एसटी महामंडळात पास घेऊन येणारे जाणारे विदयार्थी जास्त होते. मात्र या काळात प्रवाशांची संख्या कमी झालेली आहे. दहावी आणि बारावी परिक्षेसाठी अनेकांना केंद्रापर्यंत जावे लागत आहे. या विदयार्थ्यांसाठी विशेष बसचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी परीक्षेच्या दृष्टीने फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आदेश जिल्हयातील आगारांना दिले आहेत. याशिवाय प्रत्येक तालुक्यातील आगारांना संबंधीत शाळेकडून त्यांचे विदयार्थी वाहतूक करण्यासाठी मागणी आल्यास, त्या प्रमाणे एसटीचे नियोजन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अरूण सिया यांनी दिली.
Web Title: 10th 12th Exams Update School St On Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..